पोलिस गाड्या ताब्यात घेऊन चार दिवस उलटले महसूलचे अधिकारी नामदेव मुळेकर यांनी फिर्याद देण्यास विलंब लावल्याने आज झाली अखेर कार्यवाही गुन्हा दाखल झाला…
भोकर:-(प्रतिनिधी)
वाळू माफियांवर भोकर पोलिसांनी कुठलीच गय न करता कार्यवाही साठी पोलिस पुढे सरसावले पण सदरील वाळू (गौण खनिज ) हे महसूल प्रशासनकडे वर्ग असते म्हणून त्यावर त्यांच्या कार्यवाही साठी प्रथम स्थान असते त्यासाठी त्यांच्या गैरहजर मध्ये वाळू माफिया तस्करी वाळूची करत असतात पण पोलिस ताब्यात गाड्या असताना सुद्धा महसूल प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे असे चित्र शहरात दिसू लागले असताना एकमतने ह्याची दखल घेऊन बातमी प्रसारित केल्याने सदरील वाळूच्या गाडीवर आज कार्यवाही झाली.
नामदेव ग्यानोबा मुळेकर वय ५३ व्यवसाय महसूल अधिकारी किनी रा. नारवट यांनी दिलेल्या आज रोजच्या फिर्यादी वरून दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्या गाडी मध्ये प्रत्येकी पाच ब्रास वाळू विना परवानगी असल्याने
सदरील कार्यवाही ही गाडी चालकावर झाली आहे.गाडी क्रमांक एम एच ४६ बी यू २४०४ ,एम एच २६ सी डब्लू २४०४ ह्या दोन्ही गाड्या माल अंदाजे ५०,००० आणि २ गाड्या असे एकूण ६० लाख ५० हजार जप्तीची कार्यवाही करण्यात आले आहे.
सदरील गाड्या ह्या भोकर म्हैसा किनवट रोड च्या टी पॉईंट बायपासच्या डाव्या बाजूस मोकळ्या जागेत असल्याची गुप्त माहिती अजित कुंभार पोलिस निरीक्षक यांच्या पथकास मिळताच त्यांनी त्या गाड्या मध्ये असलेल्या मालाच्या परवानग्या मागितल्या असता ते नसल्याचे समजल्याने विनापरवाना असलेल्या गाड्या त्यांनी ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन मध्ये ताब्यात गाड्यात आणल्या आणि कार्यवाही साठी महसूल कडून येणाऱ्या अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत आज चार दिवस उलटले आणि फिर्यादी नामदेव मुळेकर यांच्या सांगण्यावरून आज गुन्ह्याची नोंद झाल्याची समजले.
सदरील कार्यवाहीने पोलिस निरीक्षक अजित कुंभार,तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्या कडे शहराला सिंघम अधिकारी लाभले म्हणून चर्चा होत आहे.
पुढील तपास पो हे कॉ २५३३ श्री केळकर करत आहे.
