जिल्हापरिषद,पंचायत,नगरपरिषद ह्या सर्व जागा स्व-बळावर रासपा लढणार….साहेबराव गोरठकर

भोकर:-(प्रतिनिधी)
भोकर तालुका हा कोणत्याच पक्षाचा गड म्हणून आज पर्यंत नाही म्हणून कोणत्याही पक्षाची कधीही सत्ता येथे आणायला जनतेच्या कौल ठरवत असते रासप ला सुद्धा अनेक कार्यकर्ते जुळवले आहे.महादेव जानकर यांच्या विचारावर प्रेम करणारे अनेक त्यांचे अनुयायी ओबीसीनेते पक्षाचा पद मिळवली आहेत ते सक्रीय काम करत आहेत.मागील लोकसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि ओबीसी समाजाचे नेते महादेव जानकर यांनी यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती महादेव जानकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते आणि ते स्व-बळावर लढवले काही ठिकाणी यश फार जवळून गेले आहे पण यंदा होणार्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर मध्ये चांगल्या प्रकारे स्थानिक कणखर नेतृत्व असलेले उमेदवार देवून त्यांना निवडून आणू असे बोल्या गेल्या.मागील लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी परभणी येथे महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी आले होते.नंतर काही दिवसांनी विधानसभा वेळी महादेव जानकर यांनी मुलाखतीमध्ये भाजप कधीही लहान पक्षांना मोठे करत नाही. लहान पक्षांचे उमेदवार स्व:पक्षात घेऊन लहान पक्षांना शक्तीहीन करतो, अशी टीका देखील त्यानी केली आहे.असेच चित्र भोकर तालुक्या मध्ये झाले अशोक चव्हाण साहेब सुद्धा लहान पक्षाला सोबत घेऊन कधी युती करत नाही त्यांच्या कार्यकर्ते यांना प्रवेश ते पक्ष शक्तीहीन करण्याचा प्रयत्न करत असतात पण यावेळी सर्व नागरिक जागे आहे अशा भूलथापाना बळी आमचे रासप(महादेव जानकर) ओबीसी नेत्याचे कार्यकर्ते नाहीत हे त्यांना दाखवून देवून कॉंग्रेस,भाजपा,राष्ट्रवादी सोबत मोठ्या हिमतीने लढू सर्व ठिकाणी उमेदवार आम्ही देणार आहोत इच्छुकांनी अनेक फॉर्म आम्हाला भरून दिले आहेत.पक्षाचा कार्यकर्ताचा आधी विचार करून इतर नवक्या उमेदवाराचा नंतर विचार केला जाईल असे यावेळी त्यांनी सांगितले.

Leave a Reply