पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांच्या नेतृत्वाखाली महार्षि वाल्मिकी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी
भोकर:-(प्रतिनिधी)
भोकर कोळगल्ली,महादेव मंदिर मार्ग,लहुजी वस्ताद चौक मार्गे,शिवाजी महाराज चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत मिरवणूक निघत असते जयंती मंडळ कोळगल्ली येथील कोळी समाजाच्या युवकांनी ढोल ताशाच्या गजरात ही मिरवणुकीत काढली या मिरवणुकीत प्रौढ, महिला,युवक – युवती सामील झाले कोळगल्ली येथे वाल्मिकी कोळी समाजाच्यावतीने आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात साजरी केली जाते.या ठिकाणी भव्य दिव्य असा महर्षी वाल्मिक गुरु यांचा पुतळा देखील आहे. यावर्षी देखील जयंती मध्ये चांगली मिरवणूक झाली. समाजातील एकतेचा, सन्मानाचा आणि ज्ञानाचा संदेश देणाऱ्या या जयंती सोहळ्याला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाची सुरुवात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. भोकर येथील नंदीनगर मधील गंगाधर नक्कलवाड, विजयकुमार मोरे कोळी यांच्या नेतृत्वात जयंती साजरी करण्यात आली अतिशय सुंदर गाडीला सजून जयंती मध्ये वेगवेगळ्या लाईट मुळे आकर्षण वेधले होते.शास्त्री नगर ,गांधी नगर येथील युवकाकडून देखील जयंती करण्याचं दुसर वर्षे अगदी चांगल्या प्रकारे उत्साहात पार पडले ढोल, तासाचा गजरात नाचत युवकांनी फुलांचे आणि गुलालाची उधळण करून ही जयंती साजरी केली यावेळी जयंती मध्ये विश्व हिंदू परिषदेचे पंजाब हूलगुंडे,संतोष मामा बोईनवाड,बालाजी चार्लेवाड,नितेश बालाजी भंडरवाड(अध्यक्ष,जयंती मंडळ),बजरंगतंगलपलेवाड,कैलास घंटलवाड,बालाजी चार्लेवाड,अविनाश भूमावाड,सुभाष तुंबलवाड,रामेश्वर तुंबलवाड,श्रीकांत पिलवंट,शंकर उलगुलवाड,संतोष मामा बोईनवाड शास्त्री नगर,गांधी नगर युवकांनी मिळून साजरी केली.
यावेळी सर्व कोळी बांधव लोकनेते,कोळी समाजाचे नेते नागनाथराव घिसेवाड यांनी सर्व जयंती मंडळास शुभेच्छा दिल्या.
जयंती मिरवणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.