मौजे बोरगांव येथील गावकर्यांसी गांव भेट व बैठक संपन्न

भोकर तालुक्यातील देवाठाणा पंचायत समिती गण एस.सी.प्रवर्गाला सुटला असून सभापती पदासाठी आरक्षीत आहे.
देवठाणा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी इच्छुक उमेदवार म्हणून संवाद व गाव भेट दौऱ्यात आज मौजे बोरगांव येथील गावकर्यांसी आगामी प.स.निवडणूकीत सामाजिक, राजकीय चळवळीतील कार्यकर्ते सखाराम वाघमारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीने निवडणुकीत उतरणार आहेत त्या निमित्त देवठाणा प.स.गणात संवाद भेटी-गाठी दौरा चालू असून आज दि.१५ नोव्हेंबर रोजी मौजे बोरगांव ता.भोकर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हा महासचिव नागोराव शेंडगे बापू यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
यावेळी बैठकीत गावकर्यांसी संवाद साधून चर्चा विचार विनीमय केला व या बैठकीला नागोराव शेंडगे बापू यांनी मार्गदर्शन पर बोलताना वाघमारे सामाजिक राजकीय चळवळीतील तरुण तडफदार उच्च शिक्षीत होतकरू विकासाची जात असलेला कार्यकर्ता म्हणून आपन सर्व त्याच्या पाठीशी राहणार का असा प्रश्न विचारताच बैठकीत सर्व गावकऱ्यांनी हात उंचावून समर्थनार्थ पाठीशी राहणार असे अभिवचन दिले.माजी सरपंच आनंदराव पाटिल बोरगांवकर,माजी सरपंच गीतेवर बोटलेवाड, यांनी मार्गदर्शन केले तर इच्छुक उमेदवार सखाराम वाघमारे यांनी निवडणूक लढवण्या बाबदची भुमिका विषद केली.

Leave a Reply