डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी कपिल कांबळे तर कार्यअध्यक्षपदी महेंद्र दुधारे यांची निवड
भोकर (प्रतिनिधी) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या सार्वजनिक जयंती महोत्सवानिमित्त दि.१८ मार्च २०२६ रोजी मागील वर्षाचे अध्यक्ष जयभीम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचशिल बुध्द विहार शहीद प्रफुल नगर भोकर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महात्मा फुले नगर,समतानगर,शहीद प्रफुल नगर,डॉ आंबेडकर नगर,इंदिरा नगर,भिम टेकडी,आशोक नगर शहरातील सर्व नगरातील सर्वानुमते पुढीलप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती घोषित करण्यात आली अध्यक्ष कपिल कांबळे, कार्याअध्यक्ष महेद्र दुधारे,उपाध्यक्ष राहुल सोनकांबळे,सचिव संदीप गायकवाड, संघटक विजय दवने यांची शहरातील सर्व नगरातील सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.यावेळी साहेबराव मोरे,गौतम कसबे,देवा हटकर,मिलिंद गायकवाड,विकास क्षिरसागर,
निखिल हंकारे,अशीत सोनुले,दलीत डोंगरे, धम्मा कदम, गंगाधर सोनकांबळे (छोटू),सतीष जाधव, विजय सोनकांबळे ,पेन्टर चंद्रकांत दुधारे,संदिप लोमटे, माधव कांबळे,रितेश कावळे,संतोष डोंगरे,अविनाश वाघमारे, ललीत राव मनोज शिंदे,प्रकाश राव,अविनाश गायकवाड,प्रितम डोंगरे, गंगाधर भवरे,सचिन कांबळे,मिलींद दुधारे,संघदिप वारघडे,जितेंद्र कोकाटे,आदींची उपस्थिती होती.
