निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची चैत्र पौर्णिमा अति उत्साहात साजरी

इंदापूर :तालुका प्रतिनिधी गणेश धनवडे निमसाखर गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची चैत्र पौर्णिमा अति उत्साहात साजरी करण्यात आली श्री स्वामींची ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली तसेच हरिभक्त परायण श्री नागनाथ महाराज क्षिरसागर पंढरपूर यांचे प्रवचन सेवा झाली नंतर श्री स्वामींचा आरती व जप घेण्यात आला नंतर सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद देण्यात आला महाप्रसादाचे अन्नदाते श्री लहू पांडुरंग दरेकर यांच्यातर्फे देण्यात आला तसेच नेहमीप्रमाणे पालखीची फुलांची सजावट श्री राजेंद्र मारुती घोडे यांनी केली तसेच मंदिरातील रांगोळीची सेवा सौ शितल सुनील टकले यांनी केली. मंदिरामध्ये श्री विनोद हनुमंत चव्हाण यांचा भजनाचा कार्यक्रम झाला त्यांना साथ महादेव भजनी मंडळाने दिली. या कार्यक्रमाला गावातील सर्व स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply