भोकर ग्रामीण रुग्णालयास व्हील चेअर भेट

भोकर :- भोकर येथील नागरिक श्री गणेश अंगरवार यांनी आई समान असलेल्या त्यांच्या सासूबाई श्रीमती कमलबाई नारायण आंचेवार यांच्या स्मरणार्थ भोकर ग्रामीण रुग्णालयास एक व्हिल चेअर भेट दिली…
यावेळी डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक, नागरिक गणेश अंगरवार, डॉ. कार्त्या रेड्डी मॅडम, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, क्ष- किरण वैज्ञानिक अधिकारी रोहिणी भटकर, लिपिक प्रल्हाद होळगे, गणेश अंगरवार,आंचेवार कुटुंबिय, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.