नांदेड व‍ितरण ज‍िल्‍हाध‍िकारी तथा ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरणचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्‍या शोध व बचाव कार्य, #आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी उपयोगी पडणारे साहित्‍यांचे व‍ितरण

मुख्यसंपादक/विजयकुमार मोरे कोळी

नांदेड दि. 16 जुलै :-आपत्ती प्रसंगी शोध व बचाव कार्य करण्‍यासाठी आवश्‍यक असलेले साह‍ित्‍याचे #व‍ितरण ज‍िल्‍हाध‍िकारी तथा ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राध‍िकरणचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्‍या प्रमुख उपस्‍थ‍ितीत ज‍िल्‍हाधि‍कारी कार्यालय नांदेड येथे 16 तहस‍िल कार्यालय, 8 उपव‍िभागीय अध‍िकारी कार्यालय, मनपा, नप, होमगार्ड व क्‍युआरटी यांना नुकतेच वितरीत करण्‍यात आले.

यावेळी निवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी किरण अंबेकर, ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अध‍िकारी किशोर कुऱ्हे, ज‍ि.आ.व्‍य. सहायक गौरव त‍िवारी, आ.व्‍य. व‍िभागाचे बारकुजी मोरे म.स. कोमल नागरगोजे, मनपाचे अग्‍नीशमन व‍िभागाचे केरोजी दासरी, कांबळे, ना. तह. जेठे यांच्‍यासह सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी उपस्‍थित होते.

राज्‍य आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधि‍करण व राज्‍य शासन ज‍िल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधि‍करण यांच्‍याकडुन प्राप्‍त झालेले शोध व बचाव कार्यासाठी आपत्‍ती व्‍यवस्‍थापनास उपयोगी असे सा‍हित्‍य व‍ितरणांमध्‍ये तहस‍िल कार्यालय- माहुर, नांदेड, मुखेड, धर्माबाद, बिलोली, नायगाव, हदगाव व मनपा यांना रबरीबोट, बोटचे इंज‍िन व‍ितरीत करण्‍यात आले. तर उपविभागीय अध‍िकारी कार्यालय देगलूर, किनवट, नांदेड यांना ड्रोन कॅमेरासह इतर साहित्‍य व‍ितरीत करण्‍यात आले आहे. तसेच उपव‍िभागीय अध‍िकारी कार्यालय, मनपा, नप, होमगार्ड व क्‍युआरटीसह सर्व तहस‍िल कार्यालयांना शोध व बचाव कार्याकरीता आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी फायर एक्‍स्टींगग्रेसर, फायरमन पीक अॅक्‍स, फर्स्‍टऐड किट, गम सेफ्टी बुट, हॅण्‍ड गोल्‍ज, लाईफ बॉय, लाईफ जॅकेट, सेफ्टी गॉगल्‍स, बासकेट स्‍ट्रेचर, फायर ग्‍लास स्‍ट्रेचर, टुल कि‍ट, सेफ्टी हेलमेट, थ्रो बॅग्स, नेव्‍हीगेशन लाईट, रेडीओ वॉकी, नायलॉन रोप, एलईडी टॉर्च, अॅकर फॉर इनफ्लांटेबल रेस्‍‍क्‍यु बोट, ग्लॅवानाईज मेटल बकेट ऑर बेलर ट्वीन प्रॉनग ग्राफेल/कॅट हुक्स,चेन सॉ मशीन, अॅक्‍स/हॅस्‍चेट इ. साहि‍त्‍य व‍ितरीत करण्‍यात आले आहे.

#नांदेड ज‍िल्‍हयाचा आपत्तीबाबतचा दरवर्षीचा अंदाज व पुर्व इत‍िहास पाहता साधरणतः ऑगस्‍ट महिन्‍याच्‍या अखेरीस व सप्‍टेंबर मह‍िन्‍यात मान्‍सुनच्‍या पावसाचे प्रमाण वाढते, अति‍वृष्‍टी होत असते. ज‍िल्‍हयातुन वाहणाऱ्या गोदावरी, पैनगंगा, आसना, मन्‍याड, लेंडी, कयाधु, मांजरा इ. नद्यांच्‍या पात्रातील व ज‍िल्‍हयातील धरणाच्‍या पाणीसाठ्यात वाढ होत असते. त्‍यामुळे मागील दोन-तीन वर्षापासून या कालावधीत ज‍िल्‍हयात पुरसदृश्‍य पर‍िस्‍थ‍िती न‍िर्माण होत असते. अशावेळी नांदेड शहरासह सर्व ज‍िल्‍हाभरात व‍िशेषतः नांदेड शहर व ग्रामीणसह, किनवट, माहुर, हदगाव, ह‍िमायतनगर, मुदखेड, उमरी, मुखेड, देगलूर, बिलोली, कंधार इ. ठ‍िकाणी पुरात अडकलेल्‍या शेतकरी, नागरीकांचे व पाळीव पशुंचे शोध व बचाव कार्य करावे लागल्‍याचा अनुभव आहे. त्‍यामुळे पुर्व तयारीचा भाग, दक्षता व शोध व बचाव कार्य करणाऱ्या यंत्रणांना सज्‍ज करण्‍यासाठी या शोध व बचाव कार्य, आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाकरीता उपयोगी पडणारे साहित्‍यांचे व‍ितरण करण्‍यात आले आहे.

Leave a Reply