शासकीय वाळू डेपोतून गरजू ग्राहकास घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध

शासकीय वाळू डेपोतून गरजू ग्राहकास घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध
नांदेड दि. 31 जुलै : जिल्ह्यातील घरकुल लाभार्थी व खाजगी ग्राहकांना 1 ऑगस्ट 2025 पासून आपल्या जवळच्या वाळू डेपोमधून वाळू उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी संबंधीत गरजु ग्राहकांना ऑनलाईनद्वारे महाखनिज प्रणालीवर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कालावधीत (सार्वजनिक सुट्टी वगळून) वाळू बुकिंग करुन बुकिंग केलेल्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत वाळू डेपोतून वाळू उचल करणे बंधनकारक राहणार आहे.