विविध मागण्यासाठी पत्रकार एजाज कुरेशी यांचे उपोषण सुरू

भोकर(प्रतिनिधी) वारंवार माहितीच्या अधिकारातून अर्ज देऊन सुद्धा नगरपरिषदेकडून रीतसर माहिती मिळत नसल्यामुळे व तसेच पाणी पुरवठा विभागाची माहिती मागितली असता घनकचरा विभाचे चुकीचे व दिशाभूल करणारे पत्र काढून वेळ टाळण्यासाठी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्यामुळे पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते हे एजास कुरेशी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची वेळ आली असून आज दिनांक 12 ऑगस्ट पासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आपल्या बेमुदत अमरन उपोषणाची सुरुवात केली आहे
भोकर नगरपरिषद मध्ये एका व्यक्तीच्या नावावर आतापर्यंत किती गुंठेवारी झाले याची माहिती व स्वच्छता व पाणीपुरवठा विभागात कंत्राटी तत्त्वावर 2018 ते 2022 पर्यंत काम करणाऱ्यांची तपशीलवार यादि ची मागणी माहितीच्या अधिकारातून करण्यात आली होती परंतु संबंधित विभागाच्या वतीने चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्यात आल्याने पत्रकार शेख एजाज कुरेश यांनी दिनांक 12 ऑगस्ट पासून उपविभागीय अधिकाऱ्यासमोर आपल्या विविध मागण्यासाठी उपोषणाची सुरुवात केली आहे