न्याहाळोद येथे बुधवार दिनांक १३/८/२०२५ ते २०/८/२०२५ पर्यंत विठ्ठल मंदिर न्याहाळोद येथे भागवत कथेचे यजमान ह.भ.प अभिमन धर्मा माळी यांच्याकडून कै.योगेश अभिमन माळी, ह.भ.प कै.संभाजी पवार (राजू दादा), कै.अरविंद शामराव पवार आदरणीय ग.भा जिजाबाई सदाशिव माळी,कै.सदाशिव चिंधा माळी यांच्या स्मरणार्थ अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री. पांडुरंगाच्या कृपेने व थोर अशा साधुसंतांच्या व ऋषीमुनींच्या व मोठेबाबा यांच्या आशीर्वादाने स्वप्निलदासजी महाराज, श्रीधामवृंदावन यांचा गोड व सुरेल आवाजात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व संगीतमय श्रीमद् भागवत कथेचा कार्यक्रमाचे आयोजन तसेच महाप्रसाद यजमान कै. प्रतापराव जयवंतराव पवार यांच्या स्मणार्थ यजमान पंचायत समिती सदस्य श्री.योगराज प्रतापराव पवार यांच्याकडून होणार आहे. श्री. विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, विठ्ठल मंदिर सप्ताह समिती, माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अरविंद पवार,कृष्णदास कुंभार सर,गणेश धोबी,अण्णा पाटील, हंसराज वाघ, किशोर माळी, प्रवीण पवार,अशोक काकुळदे, हेमंत पवार, माजी सरपंच कैलास पाटील, आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे, पहेलवान देविदास (अण्णा) रायते,पत्रकार विशाल रायते व सर्व ग्रामस्थ मंडळ न्याहाळोद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात ह.भ.प.सुदर्शन महाराज गोंदूरकर धुळे, ह.भ.प.भूषण महाराज, ह.भ. प.गौरीताई महाराज, ह.भ.प.सौ. शैलाताई महाराज, ह.भ.प.चेतन महाराज मालेगावकर, ह. भ.प.खुशाल महाराज यांनी उत्तम प्रकारे कीर्तनाच्या माध्यमातून भागवत गीतेचे महत्व पटवून जनजागृती केली.कीर्तनाला संगीताची साथ ह.भ.प.छोटू महाराज, ह.भ.प.संजय महाराज, ह.भ.प.गुलाब महाराज, ह.भ. प.पांडुरंग महाराज, ह.भ.प.खंडू महाजन यांनी दिली.विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ,हरिपाठ भजनी मंडळ, सगर राजा भजनी मंडळ,रामदेव बाबा भजनी मंडळ, संत सावता भजनी मंडळ, दत्त भजनी मंडळ, संत गोरोबा भजनी मंडळ व स्वाध्याय परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply