भोकर( तालुका प्रतिनिधी) अण्णाभाऊंना जातीयचे चटके बालपणातच लागले, त्यांचे लिखाण वास्तववादी होते, गरिबीचे चटके, पोटाची भूक, विषमतेची वागणूक, कामगारांच्या व्यथा हे सार त्यांनी साहित्यात मांडलं त्यांच्या साहित्याला जगात तोड नाही म्हणून त्यांचे विचार केवळ नाचून नाही तर साहित्य वाचून आचरणात आणावे असे विचार ज्येष्ठ पत्रकार बी. आर. पांचाळ यांनी सायाळ येथील डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त बोलताना मांडले.26 ऑगस्ट 2025 रोजी तालुक्यातील मौजे सायाळ येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी करण्यात आली सकाळी 10 वा. डॉ. अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच प्रतिनिधी सुमेश फुगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यानंतर छोट्या बालकांनी आपले मनोगत व्यक्त केले, प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ज्येष्ठ पत्रकार बी.आर. पांचाळ पुढे म्हणाले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे योगदान फार मोठे आहे शाहिरी, लोककला, पोवाडे यांच्या माध्यमातून त्यांनी समाजाची जागृती केली, अस्सल साहित्याची निर्मिती केली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी समाजात रुजवले, आज खऱ्या अर्थाने त्यांचे साहित्य वाचून समाजाची उन्नती झाली पाहिजे केवळ जयंती नाच गाण्यासाठी नसून राष्ट्रपुरुषांचे विचार आत्मसात करण्यासाठी आहे आजच्या युवकांनी महापुरुषांचे विचार अंगीकारले तर येणारी पिढी चांगली निर्माण होईल असेही ते शेवटी म्हणाले, सुमेश फुगले, सुरेश पाटील डुरे, शिवाजी गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले, तंटामुक्ती अध्यक्ष देवराव पा.डुरे, ग्रा.पं. सदस्य गणेश राव येलुरे, विनायक हजापुरे, व्यंकटराव मांजरे, आनंदराव सावंत, सचिन डुरे, केरबा फुगले, प्रभू गव्हाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती जयंती मंडळाचे सुनील वाघमारे, अजय गव्हाळे, विकास भालेराव, रवी गायकवाड, साईनाथ डूमलोड यांच्यासह सर्व मंडळांनी परिश्रम घेतले गावात अण्णाभाऊंच्या प्रतिमेची मिरवणूक करण्यात आली