सर्व धर्मीय मनातील चेहरा शेख युसूफभाई यांना नगराध्यक्ष पदासाठी संधी दिल्यास न.प. वर भाजपचाच गुलाल…
परतीच्या पाऊसाची रिपरिप ओसरत असतानाच आता निवडणूकीच्या गर्मीची धाकधुक सुरू होत असुन सध्या मी तु ची रेलचेल सुरू जरी असली तरी भोकर शहराच्या भौगोलिक विकासदृष्ट्या सर्व धर्मीय जनतेतील आश्वासक चेहरा म्हणून माजी नगरसेवक शेख युसूफ यांच्या कडे पाहीले जात असुन नगराध्यक्ष पदासाठी त्यांना संधी दिल्यास भोकर नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकण्यास कुठलीच ताकद रोखणार नसल्याचे जनतेतुन बोलल्या जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जरी जाहीर झाल्या नसल्या तरी सर्वच पक्षांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.प्रथम डिसेंबर मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होणार असून त्यानंतर जानेवारी महिन्यात नगरपालिका, नगरपरीषद व महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याचे समजते.नगराध्यक्ष जनतेतून असल्याने अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.परंतु भोकर शहरातील मतदारांची आकडेवारी पहाता येते सर्व समावेशक उमेदवारच बाजी मारु शकतो असंही शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे यात युवा प्रिय व संकट काळी धावुन मदत करणारे युवा नेतृत्व म्हणजे युसुफ शेख हे फिट बसतात.यापुर्वी त्यांच्या सौभाग्यवती उपनगराध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले.त्यांना नगर परिषदेचा चांगला अनुभव आहे.सन २०२५ साठी नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण पुरुषांसाठी सुटले आहे.आणी नगराध्यक्ष हे थेट जनतेतुन आहे. त्यामुळे सामाजिक, राजकीय व धार्मिक समीकरण पहाता येथे शेख युसूफ यात फिट बसतात.ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक आहेत.शेख युसुफ यांचे कार्य म्हणजे अनेकांच्या अडीअडचणीत धावुन जाणे, आर्थिक मदत करुन दिलासा देणे, वार्डातील नागरीकांच्या समस्यांचे निराकरण करणे,युवा तरुणांना खेळासाठी प्रोत्साहन देणे तसेच सर्व सामान्य ते सर्व धर्मीय लोकांत आपुलकिने वागणे अशा उमेदवारांची भोकर वाशीयांच्या भौगोलिक विकासदृष्ट्या नगराध्यक्ष म्हणून निवडुन देणे गरजेचे आहे.त्यामुळे सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते यांच्याशी सौदाहर्याचे संबंध आहेत. दलीत, मुस्लिम वा हिंदू,जैन असे जात वा धर्म न मानता विकास हेच जात धर्म म्हणून कार्य करण्याच ध्येय युसुफ शेख हे बाळगून आहेत.अशा या उमदा युवा नेतृत्वास खा.अशोक चव्हाण व आमदार श्रीजया चव्हाण यांनी नगराध्यक्ष पदाची संधी दिल्यास भोकरच्या नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकण्यास कुठलीच ताकद रोखणार नाही.असी भोकर शहरात चर्चा आहे.बघु या घोडा मैदान जवळच आहे.
