कायाकल्प ” कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पिअर असेसमेंट संपन्न..

भोकर :- कॉलिटी अश्युरन्स या कार्यक्रमांतर्गत ” कायाकल्प ” या कार्यक्रमाचे नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत संस्थांचे पिअर असेसमेंट करण्याकरिता लातूर जिल्ह्यातील असेसर टीम असेसमेंट करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आज दि. १० नोव्हेंबर रोजी आली होती. लातूर विभागीय असेसर टीम प्रमुख डॉ.हरेश्वर सूळे लातूर, श्री सूतार आरोग्य निरीक्षक लातूर,डॉ.श्यामसुंदर लोखंडे गुणवत्ता आश्वासन समन्वयक जिल्हा नांदेड हे आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शनानुसार व ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रताप चव्हाण यांच्या नियोजनानुसार ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डॉ. हरेश्वर सूळे,श्री सूतार व डॉ.शामसुंदर लोखंडे हे आले होते. यानंतर लातूर विभागीय टीमने रुग्णालय बाह्य परिसर स्वच्छता पाहणी केली. आपातकालीन कक्ष पाहणी करून आंतर रुग्ण विभाग पाहणी, सर्व विभागातील स्वच्छता. प्रसूती गृह विभाग, डायलेसिस विभाग, शस्त्रक्रिया विभाग पाहणी केली. बाह्यरुग्ण विभाग पाहणी करून स्वच्छता पाहणी केली, दंत विभाग, सिकलसेल विभाग, आयसीटिसी विभाग, मैत्री क्लिनिक कक्ष, आयुष विभाग पाहणी केली, औषधी विभाग पाहणी करून कायाकल्प चेक लिस्टनुसार सर्व साहित्य अहवाल,पत्रके औषधी इत्यादी बाबींबाबत पाहणी करून समाधान व्यक्त केले यानंतर सर्व डॉक्टर्स, स्टाफ कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांना डॉ. श्यामसुंदर लोखंडे व लातूर विभागीय टीमचे प्रमुख डॉ. हरेश्वर सूळे यांनी सखोल मार्गदर्शन केले. ग्रामीण रुग्णालय भोकर येथील आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, परेसेविका श्रीमती उज्वला पवार यांनी आलेल्या लातूर विभागीय टीमचे आभार व्यक्त करून सर्व कर्मचाऱ्यांनी कमी वेळात चांगली तयारी केली. याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. या कार्यक्रमास रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,स्टाफ कर्मचारी व कार्यालय कर्मचारी उपस्थित होते.