अवैध्य गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी केटिएल कंन्ट्रक्शन ला साठ लाख एकतिस हजारांचा दंड.भोकर तहसिलदार विनोद गुंडमवार यांची कार्यवाही
भोकर:प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे राय खोड येथील गट क्रमांक 47 मधून उमरी भोकर कारेगाव या रस्त्याचे काम करण्यासाठी केटीएल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड चैतन्य नगर या कंपनीने परवान्या पेक्षा अधिक चे उत्खनन करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तहसीलदार विनोद गुंड मवार यांनी सुमारे 60 लाख 31 हजार दोनशे रुपये दंड ठेवला असून सदर दंड विहित वेळेत न भरल्यास पुन्हा पाचपट दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत.
उमरी भोकर कारेगाव या रस्त्याचे काम के टी एल कंपनीस देण्यात आले होते या कंपनीने सदरील रस्त्यामध्ये मुरमाचा भरणा करण्यासाठी रायखोड शिवारातील गट क्रमांक 47 मध्ये तत्कालीन तहसीलदारांनी मुरूम उत्खननासाठी परवानगी दिली होती मात्र या कंपनीने शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून अधिकचे उत्खनन करत आपली तुंबडी भरून घेतली होती.
त्यामुळे अधिकचे उत्खनन झाल्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संभाजी चेरकेवाड यांनी सदर प्रकरणी कार्यवाहीसाठी पाठपुरावा करून प्रकरण उचलून धरले होते.
याप्रकरणी अखेर दिनांक……रोजी उपलब्ध चौकशी अहवाला नुसार सुमारे 60 लाख 31 हजार दोनशे रुपयाचा दंड भोकर तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी ठोटावला असून सदरील दंड भेद नमुन्यात न भरल्यास पाचपट अधिक दंड वसूल करण्याचाही आदेश तहसीलदार यांनी केटीएल कंपनी दिला आहे.