भोकर :- (प्रतिनिधी)
भोकर येथील विश्वकर्मानगर परिसरातील अर्धवट नाली व रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, या मागणीसाठी आज दि. 25 नोव्हेंबर 2026 दुपारी 12.30 वाजता पासून तहसील कार्यालय,भोकर समोर आमरण उपोषण करण्यात आले आहे.सदरील प्रभाग 11 मधील नवनिर्वाचित नगरसेवक विजय गंगाधर पवार आणि सौ.छाया मनोज गिमेकर हे निवडून आले आणि त्यांच्या कार्यकाळ सुरू होण्या अगोदर थेट सामाजिक कार्यकर्ते यांचे उपोषण प्रभागातील विश्वकर्मा नगर येथील प्रलंबित विकासबाबतीत आहे अशी चर्चा सुरू आहे.
सदर उपोषण चंद्रकांत विठ्ठलराव मुस्तापुरे, रा. विश्वकर्मानगर, भोकर हे करत असून ते शिव, भीम, सेना या सामाजिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक वेळा संबंधित प्रशासनास लेखी स्वरूपात निवेदने देऊन परिसरातील अर्धवट नाल्या व रस्त्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत माहिती दिली होती. मात्र, अद्यापही या समस्या मार्गी न लागल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले.
“प्रशासनाने वेळेत दखल न घेतल्यास नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनू शकतो,” असे मुस्तापुरे यांनी नमूद केले. उपोषणाच्या कालावधीत काही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या आंदोलनामुळे भोकर शहरातील नागरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply