भोकर शहरात ईद ए मिलाद निमित्त भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न्

भोकर(प्रतिनिधी) मिलाद कमिटी च्या वतीने भोकर शहरात सोमवारी जश्ने ईद मिलाद उन नबीच्या निमित्ताने ऐतिहासिक आणि भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
ईद ए मिलादून नबी च्या निमीत्ताने
दि 8 सप्टेंबर रोजी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील मस्जिदे आयेशा येथून सकाळी 10वाजता रॅली सुरू झाली. नांदेड रोड.उडान पुल वरून रॅली डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आल्या या ठिकानी विविध राजकिय व सामाजिक संघटनेच्या वतीने मिलाद कमेटी च्या पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला
रॅलीत.न.पचे मा उपाध्यक्ष प्रति शेख युसूफ बाबाखान जवाजोद्दीन बडबेकर हमीद खाॅन बाबु भाई तामसेकर मिर्झा ताहेर बेग रफीख सेठ भोजानी शेख साबीर ताजोद्दीन भाई कासीम साब मुजीब भाई मुजीब कुरेशी मसूद भाई अर्शद अहेमद आदि शामील झाले होते मिरवणूक पुढे सरकत छत्रपती शिवाजी चौक क्रातीवीर वस्ताद लहूजी चौकश मार्गे 2वाजता ईदगाह येथे पोहचली त्या ठिकाणी मौलाना शमशाद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाजे जोहर अदा करून देशाच्या एकतेसाठी प्राथर्णा करण्यात आली मिरवणुकीदरम्यान हजारो मुस्लिम बांधव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने सहभागी झाले. शहरभर “या नबी सलाम अलैका” आणि इतर धार्मिक घोषणा देत वातावरण भक्तिमय करण्यात आले. अनेक ठिकाणी नात-शरीफ पठण, तसेच मुलांचे आकर्षक वेशभूषेत सादरीकरण पाहायला मिळाले.
शहरात विविध ठिकाणी शीतपेय, वितरण करून करण्यात आले. लहान मुले व युवक वर्गाचा विशेष सहभाग या मिरवणुकीत पाहायला मिळाला.
मिरवणूक शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी मिलाद कमिटीचे अध्यक्ष आतिफ शेख उर्फ अत्तू , उपाध्यक्ष सय्यद जुनेद पटेल, तौसीफ ईनामदार मन्सूर खान पठाण एजाज भाई तुराब भाई सोहेल मिर्झा फैसल शेख इरफान खादरी मोसिन अली आदींनी परिश्रम घेतले