दादगी तालुका निलंगा येथील महादेव कोळी जमातीचे कै. शिवाजी वाल्मीक मेळ्ळे यांच्या कुटुंबियांना कोळी महासंघा च्या वतीने 50000/- आर्थिक मदत..

महादेव कोळी जमातीचे शहिद शिवाजी वाल्मीक मेळ्ळे यानी मुलांचे जात प्रमाणपञ मिळत नाही म्हणून विद्युत प्रवाहाला धरून आत्महत्या केली होती.त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत वाईट असून कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे. यामुळे कोळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ. रमेश दादा पाटील यांच्या वतीने कोळी महासंघ युवा अध्यक्ष ॲड चेतनदादा पाटील यांनी दादगी ता.निलंगा जि.लातूर येथे त्यांच्या घरी जाऊन सांत्वना भेट घेतली. आणि कुटुंबाला आधार म्हणून आर्थिक मदत रक्कम रु.50000/- करण्यात आली.व मुख्यमंत्री सहायता निधीतून कुटुंबियांना 5 लक्ष मदत आणि त्यांच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याची ग्वाही दिली.त्यांच्या कुटुंबात पत्नी आई वडील एक मुलगी एकृ मुलगा आहे. यावेळी कोळी महासंघ सहसचिव सतीश धडे, राज्य उपाध्यक्ष विठ्ठल इर्ले, राज्य कार्याध्यक्ष शिवशंकर फुले, विष्णू महाराज कोळी,मराठवाडा संपर्क प्रमुख गोविंद सोदले जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण पिटले, जिल्हाध्यक्ष पंडित फुलसुरे, युवा जिल्हाध्यक्ष अमोल सार्गे, इंद्रजीत यादगिरे रानबा कावाले, भारत सारगे , नागेश आवले व बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते