भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मुस्लिम समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान___ सय्यद मोईन

भोकर (लतीफ शेख) महाष्ट्रासह इतर राज्यात नावावरून मुस्लिम समाजाविरोधात पक्षोभक विधाने करून मुस्लिम समाजाचे मने दुखविण्याचे काम कले जात आहे परंतू या भारताला जुल्मी इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक मुस्लिम धर्म गुरूसह लाखो मुस्लिमांनी आपल्या जिवाने बलिदान दिले आहे म्हणूनच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मुस्लिम समाजाने महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे मत एमआयएम पक्षाचे मा.प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी व्यक्त केले

सोमवारी शम्स चौक खाजानगर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या जाहीर सभेला एमआयएम पक्षाचे कार्याध्यक्ष फारुख शाब्दिक साजिद बिल्डर शफिउल्ला काझी सहित आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना सय्यद मोईन म्हणाले की देशात मुस्लिम समाजाचे ऐतिहासिक अस्तित्व मिटविण्याचे कटकारस्थान रखले जात आहेत परंतु देशातील वास्तू मुस्लिम समाजाच्या राजांनी दिलेल्या योगदानाची गवाई देत आहेत देशात मुस्लिम समाजाला राज्यातील मस्जिदवरील लाऊड स्पीकर च्या नावावर उर्दू भाषेच्या नावावर ऐतिहासिक दर्ग्या संदर्भात वाद उकरून दोन धर्मीयात तेड निर्माण केल्या जात आहे मुस्लिम समाजाने सावध राहण्याची गरजेचे आहे कोणाच्याही भूलथापाला बळी न पडता आपल्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे आपल्या शहरातील सम्स मोहल्ल खाजानगर उमर मोहल्ला रसूल पुरा हुसेनपुरा आदी भागात विकास कामे झालेली नाही या भागात विकास कामे करण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या ज्या प्रकारे नांदेड शहरात पक्षाच्या नगरसेवकांनी निवडून येऊन मुस्लिम समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले त्याच प्रकारे आपल्या शहरातील आपण निवडून दिलेले नगरसेवक त्याच प्रकारे काम करून आपल्या प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचे काम करतील अशी गवाही यावेळी एमआयएम पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी दिली
सदरील सभा यशस्वी करण्यासाठी एमआयएम पक्षाचे जमीर खान, मुस्तफा खान, जमीर शेख ,जफर शेख ,जावीद शेख ,इर्शाद सय्यद, अजहर मुजावर, इम्तियाज बागवान, सद्दाम शेख ,शहबाज काजी, जाकीर शेख ,शाहनवाज पटेल, शौकत बागवान ,नोमान रिजवी नुर खान अरबाज नदाफ , अतिख शेख शाहरूख सहित एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले सभेला हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता