मुंबई दि (प्रतिनिधी) एमएमआरडीए च्या 2 डझन सदनिकावर अनधिकृत डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली असून आरटीआय ऍक्टिव्हिस्ट मुंनवर फरीद अली यांनी सीबीआय विभागाला नुकतीच तक्रार दिली आहे.आर टी आय ऍक्टिव्हिस्ट आणी पत्रकार मुंनवर अली यांनी सीबीआय ला दिलेल्या लिखित पत्रात म्हटले आहे कि, ईशाक दादा मिया शेख या इस्माने एमएमआरडीए च्या संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून 2 डजन हुंन अधिक सदनिका अन्य व्यक्तीस उभ्या करून आलोटमेंट करुंन घेतल्या आहेत.पत्रकार मुंनवर अली यांचे असे हीं म्हणणे आहे कि, इसाक दादा मिया शेख यांनी. डझन हून अधिक सदनिका मिळवल्या असल्या तरी मूळ मालकांना याबद्दल कसलीच कल्पना नाही. हा प्रचंड भ्रष्टाचार असून लाखो रुपयांचा घोटाळा यात दिसून येईल. सदरच्या गोटाळा व भ्रष्टाचार प्रकरनामध्ये एमएमआरडीए समाज विकास कक्षामधील अधिकारी मिळालेले असल्याचाही त्यांना आरोप आहे.नवीन पॅन कार्ड व आधार कार्ड वर नाव हस्तातरण करून नवीन व बनावट बँक खाती उघडून आलोटमेंट घेतले आहे. या कामासाठी संबंधित अधिकारी प्रयेकी 7 ते 8 लाख रुपयांची लाच स्वीकारली जातं असल्याचाही गंबीर आरोप त्यांनी केला आहे. बनावट पेपरच्या आधारे मिळवलेल्या सदनिका तात्काळ सील करून संबंधित अधिकारी वर्गाचे निलंबन होऊन व ईशाक दादामिया यास कठोर शासन करण्याची मागणी मुंनवर अली यांनी केली आहे.
Google Ad