शाहू’ची गांधीतीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड.

भोकर- दि २० मार्च.येथील ‘श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया’ची गांधीतीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झाली असून संपूर्ण नांदेड जिल्ह्यासाठी ही बाब अतिशय आनंदाची व अभिमानाची आहे. विशेष म्हणजे यंदाच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२’ मध्ये शाळेला विभागीय पातळीवर पारितोषिक मिळाले आहे. ऑक्टोबर महिन्यात मुंबई येथे तत्कालीन मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्याचे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक आदींच्या हस्ते शाळेला पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला होता.

जळगाव येथील ‘महात्मा गांधी रिसर्च फाउंडेशन’ ही एक सुविख्यात संस्था असून या संस्थेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. महाराष्ट्रातील सर्व शाळांमधून यंदा ‘शाहू’ची अंतिम फेरीत निवड झाली असून या प्रतिष्ठेच्या सन्मानासाठी नामांकन मिळणं ही बाब भूषणावह आहे. त्यासाठी श्री लाल बहादूर शास्त्री शिक्षण संस्थेचे सचिव मा शिरिषभाऊ दे गोरठेकर, संचालक मा कैलासभाऊ दे गोरठेकर, प्राचार्य संजय देशमुख कामनगावकर, संस्थेचे विविध पदाधिकारी, पत्रकार आदींसह समाजाच्या सर्व स्तरांतून ‘शाहू परिवारा’वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Google Ad