भोकर पोलिस ठाण्याचा मराठवाडा विभागातुन व्दितीय क्रमांक

 

भोकर(प्रतिनिधी) -मुख्यमंत्री १०० दिवसांच्या
प्रशासकीय सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत पोलीस स्टेशन भोकर या कार्यालयाने सर्वांगीण सर्वोत्कृष्ट कामगिरी करत मराठवाडा विभागात द्वितीय स्थान मिळवले आहे.१०० दिवसांची कार्यालयीन
सुधारणांची विशेष मोहिम विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ठ कामगिरी बजावलेली महाराष्ट्रातील तालुका
स्तरीय शासकीय कार्यालय दुसरा टप्पा या उपक्रमाचा निकाल दि.१६ मे रोजी जाहीर झाला. नांदेड पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ठ
कामगिरीचा महाराष्ट्र शासनाने आढावा घेवून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित
कुंभार यांच्या नेतृत्वाखाली विविध सर्वांगीण सर्वोत्कृष्ट उपक्रम राबविणाऱ्या भोकर पोलीस स्टेशन या कार्यालयास सर्वोत्कृष्ठ कामगिरी बद्दल
छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागातून दुसऱ्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे.या मोहिमेअंतर्गत नांदेड पोलीस दलांचे वेबसाईटचे अद्यावतीकरण करण्यात आले. ईज ऑफ लिव्हींगची सुरूवात करण्यात आली त्या अंतर्गत नागरीकांच्या सुरक्षेच्याअनुषंगाने पेट्रोलींगची सुरूवात करण्यात आली. त्या अनुषंगाने शहरात एकुण ७५४ व ग्रामीण
उपक्रम राबविणाऱ्या भोकर पोलीस स्टेशन या कार्यालयास सर्वोत्कृष्ठ कामगिरी बद्दल छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागातून दुसऱ्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले आहे.या मोहिमेअंतर्गत नांदेड पोलीस दलांचे वेबसाईटचे अद्यावतीकरण करण्यात आले. ईज ऑफ लिव्हींगची सुरूवात करण्यात आली त्या अंतर्गत नागरीकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने पेट्रोलींगची सुरूवात करण्यात आली. त्या अनुषंगाने शहरात एकुण ७५४ व ग्रामीणभागात एकुण ७३१ ठिकाणी टी कोडस् लावण्यात आले. तक्रार निवारण कक्ष स्थापण करण्यात
आले व दर शनिवारी तक्रार निवारण दिन साजरा करून आज पावेतो १ हजार ८११ तक्रारींचे
निवारण करण्यात आले. नांदेड जिल्हा पोलीस दलातील सर्व कार्यालयात दर मंगळवारी
स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कार्यालयातील सर्व जुने रेकॉर्ड यांची छाननी करून आवश्यक रेकॉर्ड जतन करण्यात आले. त्याचे अवब रेकॉर्ड करून निर्गती केली.अभिलेख कक्षाची सफाई करून अभिलेखांची अ ब क ड पध्दतीने वर्गवारी करण्यात आली. जुन्या वाहनांचे लिलाव करण्यात
आले. मुद्देमालांचा पंचनामा करून मुद्देमाल नष्ट करण्यात आले. जिल्हा पोलीस दलाच्या
कार्यालयात पिण्याचे पाणी,स्वच्छता गृहांची स्वच्छता,सर्व कार्यालयात दिशा दर्शक
फलक कार्यालयाचे परिसराचे सुशोभीकरण, सुसज्ज प्रतिक्षालय या सोई सुविधा करण्यात आल्या.
गुंतवणुक प्रसार करण्यात आला.कोचींग क्लासेस व सर्व क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्यात
आल्या. ऑपरेशन बिट कनेक्ट
राबविण्यात आले. मिशन उडाण, ऑपरेशन वारसा जतन,नांदेड पोलीस लिग,मिशन
निर्भया,मिशन समाधान, मिशन
निर्धार, मिशन एकता, असे
उपक्रम राबविण्यात आले.

Google Ad