आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे व माजी आदर्श सरपंच कैलास पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाने मंगळवार दिनांक ३/६/२०२५ रोजी संध्याकाळी ठीक ५.०० वा. न्याहाळोद ता. जि.धुळे येथे सत्कार समारंभाचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला.
त्यांचे कौतुक त्यांची जाणवणारी उणीव,कोणताही माणूस आपल्या कार्य कौशल्यावर आपले जीवन घडवत असते. जीवनात आलेल्या प्रत्येक सवालाचा जबाब शोधत असतो. जबाब छान दिले तर तो लाजबाब होत असतो असे आमचे लाडके कांतीलाल भाईदास चौधरी सर, प्रा.आयुब पठाण,प्रा.अब्दुल पठाण, इंजिनीयर विजय वाघ साहेब, नारायण जयराम जीरे, आज सेवानिवृत्त झाले आहेत.
कांतीलाल भाईदास चौधरी सर हे अनुदानित प्राथमिक शाळा वाळंबा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार या संस्थेत ३२वर्ष त्यांनी आदिवासी दुर्गम भागात नोकरी केली.अंधश्रद्धा निर्मूलन केले.कोरोना काळात आदिवासी भागात मोबाईलला रेंज नसल्यामुळे घरी जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवले. व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. दैनिक स्वातंत्र्य भारत व आदिवासी विकास संघातर्फे त्यांना तीन वेळा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. प्रा.आयुब पठाण हे साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय न्याहाळोद येथे कार्यरत ३५वर्ष त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले.१० वर्ष सीनियर कॉलेज नगाव येथे अध्यापनाचे काम केले. राष्ट्रभाषा हिंदी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.मराठी विषयाचे प्रा.अब्दुल पठाण हे देखील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नोकरीला होते.२५ वर्ष नोकरी केली. विषय तज्ञ म्हणून ते ज्ञात होते. परीक्षक व नियामक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. इंजिनीयर विजय वाघ हे जिल्हा परिषद धुळे पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते. २६ वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे व इमानदारीने नोकरी केली.११२ गावात जल जीवन मिशनचे उत्कृष्ट काम केले. प्रत्येक गावात गटारी केल्या. गोरगरिबांना घरकुल योजनेमध्ये इतर सर्व गोरगरिबांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी सहकार्य केले. नारायण जयराम जीरे ट्रीनिटी चिंचवड पुणे येथे नोकरीला३१वर्ष अत्यंत इमानदारीने व प्रामाणिकपणे नोकरी केली.ते कट्टर भाजपचे कार्यकर्ते म्हणून ज्ञात आहेत.सामाजिक कार्याची त्यांना विशेष आवड आहे.यांच्या कार्याची माहिती प्रा.मोतीलाल सोनवणे यांनी दिली. व त्यांना सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश देण्यात आला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा.या पुढच्या प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा… आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव जरी असेल सेवानिवृत्ती तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती… असे शुभ संदेश देण्यात आले.
या कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित होते.आदर्श माजी सरपंच कैलास पाटील, कांतीलाल चौधरी सर, पत्रकार संजय महाजन, पत्रकार विशाल रायते, प्रा.आयुब पठाण, प्रा. अब्दुल पठाण, गोकुळ महाजन, सुनील कढरे, इंजिनीयर विजय वाघ,आदर्श समाजसेवक नासिर पठाण,आदर्श समाजसेवक गणेश धोबी,अल्ताफ खाटीक, राहुल शेटे, माजी सरपंच अण्णा पवार, बबलू धोबी, कुणाल गुरव, हिरालाल महाजन, महंमद साहा द इ. मान्यवर उपस्थित होते.

Google Ad