भीमजयंतीमध्ये पंचशील ध्वज फडकविणाऱ्या मनुवादी राजकारन्यांना मज्जाव करा…पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

मुंबई, भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 2025 भीमजयंती उत्सव भारत आणि जगभरात मोठ्या आनंदात साजरा केला जाणार आहे, आतापर्यंत काही राजकारणी आणि परधर्मीय भीम जयंतीमध्ये पंचशील ध्वज फडकावतात पण तें बेगडी लोक आहेत त्यांच्या हस्ते कोणतेही विधी साजरे केले जाऊ नयेत असे निर्देश पॅन्थर डॉ. माकणीकर यांनी आंबेडकर अनुयायांना दिले आहेत.
यापुढे अशा प्रवृत्ती रोखल्या जाव्यात यासाठी प्रसंगी स्वाभिमानी भीमसैनिकांची फौज सज्ज करणार असल्याची माहितीहीं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजन माकणीकर यांनी दिली आहे.
भारतातच नव्हे तर जगभरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचारांमुळे त्यांचा प्रभाव आणि अनुयायी यांची संख्या वाढत आहे, एवढेच नव्हे तर भीम जयंती उत्सव मुंबईसह महाराष्ट्रात जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जातो.
ग्रामीण आणि शहरी भागामध्ये भीम जयंतीची सुरुवात सकाळी बुद्ध वंदना, धम्मध्वज फडकावून केली जाते, यामध्ये काही राजकारणी परधर्मीय जे मनुवादी असतात अशी लोक पंचशील ध्वज फडकावून राजकारण करण्याचा प्रयत्न करतात, हा बुद्ध धम्मातील पंचशील ध्वजाचा अवमान असून असे प्रकार घडत असल्यास स्वाभिमानी भीमसैनिकांनी ते रोखावे अशी आग्रही भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन माकणीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
सध्या देशात आंबेडकरी जनता व बोद्ध उपासक उपासिका यांच्यावर जीवघेणे हल्ले होत आहेत, अस्मिता नष्ट करू पहिली जातं आहे. संविधान विरोधी कारवाया केल्या जातं आहेत. शिक्षण व नोकऱ्या पासून वंचित केले जातं आहे असे असतांना आंबेडकरवादी असल्याचे बेगडी प्रेम दाखविणारे या विरोधात तोंड उघडत नाहीत त्यामुळे अश्या राजकारण्यांना आपल्या धार्मिक विधीचे कोणतेही सोपस्कार त्यांच्या हातून करवून घेवू नयें असे आवाहन माकणीकर यांनी केले आहे.
जयंती उत्सवास अश्या राजकारणी लोकांना बोलवा पण त्यांच्या हातून कोणतेही विधी करू नयें. जयंती उत्सव कमिटीच्या हस्ते त्यांचा सन्मान करावा व सर्व विधी स्वाभिमानी किंवा जेष्ठ आंबेडकरवाद्याच्या हस्ते पार पाडावेत.
महाबोधी बुद्ध विहाराचा प्रश्न ज्वलंतपणे उभा असूनसुद्धा या राजकारण्यांना महाबोधी विहार मुक्त करण्यासाठी कोणते पाऊल उचलणे होत नाही. संविधानाची पायमल्लि होतेय तरीही तरीही यांना साधा निषेध करून काम काज बरखास्त करता येत नाही अश्या मनुवादी मानसिक गुलामीच्या व त्यांच्या प्रतिनिधीला आपल्या सार्वजनिक धार्मिक उत्सवाच्या महत्वाच्या विधी पासून दूर ठेवणाचे आवाहन माकणीकर यांनी केले आहे.