भोकर (लतीफ शेख) पुराचे पाणी आपल्या घरात शिरल्याने पाहून आपल्या घरातील वाहून जात असलेले सामान व अन्नधांन्य काढत असताना पुराच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यूमुखी पडलेल्या मिनाज खान यांच्या कुटुंबीयांचे एमआयएम पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी सांत्वन करून 50 हजार रुपयाची आर्थिक मदत केली. नांदेड शहरातील खडकपुरा भागातील दुलेशाह रहमान नगर भागात गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदी तुडूंब भरली असून खडकपुरा भागातील दूलेशाह रहमान नगर या भागात मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी घराघरात शिरल्याने त्या भागातील अनेक घरांना तळ्याचे स्वरूप आले आहे खडकपुरा दुलेशाह रहमान नगर भागातील मिनाज खान या 17 वर्षिय मुलगा घरात पाणी शिरल्याने वाहून जात असलेले आपल्या घरातील साहित्य कसाबसा वाचविण्याचा प्रयत्न करत असताना तो त्या पुराच्या पाण्यात बुडाला बुडाल्यामुळे त्याचे निधन झाले कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी मिनाज खान च्या वडीलांचे सांत्वन करून 50हजार रूपयाची आर्थिक मदत केली यावेळी खडकपुरा भागाचा दौरा केला स्थानिक रहिवाश्यांना धिर देऊन अल्लाह हमारे साथ है यह मसला भी हल होंगा असे सांगून त्यांना बळ देऊन या भागातील लोकांना सर्वोपरी मदतीचे आश्वासन दिले या भागातील पाकीजा नगर खडकपुरा बिलान नगर कालापूल मुबीन पुरा या भागातील घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने घरातील जीवनाशक वस्तू खाण्यापिण्याचे साहित्य सर्व खराब झाले किंवा वाहून गेले अशा सर्व कुटुंबीयांना धीर देण्यासाठी एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते या भागातील सर्वे करणार आहेत सर्वैनंतर गरजू कुटूंबांना राशन किटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सय्यद मोईन यांनी दिली यावेळी नांदेड महानगरपालिकाच्या बेजबाबदार पणाचा त्यांनी समाचार घेत पावसाळ्याच्या अगोदरच शहरातील सर्व नाल्यांची मोठ्या गटारांची स्वच्छता केली असती तर पाणी आपोआप निघला असता परंतु बेजबाबदार कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली नसल्यामुळे या भागातील घरांमध्ये पाणी कल्याणी मिनाज खान या युवकाचा मृत्यू झाला तर या परिसरातील आणि घरामध्ये पाणी शिल्याने स्थानिक रहिवाशांचे मोठे नुकसान झाले एम आय एम पक्ष या भागातील पुरामुळे नुकसानग्रस्त कुटूंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भूमिका एमआयएम पक्षाचे मा.प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांनी जाहिर केली