नांदेड, दि. २१ एप्रिल:नांदेड जिल्हा प्रशासनाने आधारकार्डविषयीच्या तक्रारी सोडवण्यासाठी एक अभिनव तंत्रज्ञानाचा वापर करत नागरिकांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. आता नागरिकांना आपल्या आधारकार्ड संदर्भातील कोणतीही तक्रार थेट QR कोड स्कॅन करून नोंदवता येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवण्यात येत असून सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.