गोविंद नारायण मानेमोड यांची सीमा सुरक्षा दलात निवड

बिलोली :- बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथील युवक गोविंद नारायण मानेमोड यांची केंद्रीय सीमा सुरक्षा पोलीस दलात (BSF) मध्ये निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात व परीसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साध्या ग्रामीण छोट्याशा कोल्हेबोरगावात लहानपणापासुनच त्यांच्या कुटुंबीयांतील माजी सैनिक -केरबा मानेमोड (CRPF) व त्यांचे चुलत भाऊ जमनाजी मानेमोड पोलीस उपनिरीक्षक (PSI) सध्या परभणी येथे कार्यरत आहेत. त्यांच्या या पार्श्वप्रभावाचा स्वप्न मनात कायम होता आपण काहीतरी मोठ व्हावं त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून त्याचीच प्रेरणा घेऊन मनात देश सेवा करण्याचं स्वप्न बाळगून कठोर मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे
त्यांचे शिक्षण महाराष्ट्रातील नावाजलेली शिक्षणसंस्था छत्रपती शिवाजी हायस्कूल, सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड येथे झाल्यामुळे तेथील सैनिकी शिक्षणाचे धडे लहानपणापासूनच मिळत गेले. त्याच बरोबर आपला मुलगा एवढ्यावरी शिक्षणातून वाया जाऊ नये म्हणून वडिल मिस्ञीकाम करत, व आई शेतमजुरी करत ,अथक कष्टातुन आपल्या मुलाला शासकीय औद्योगिक तांत्रिक विद्यालय, किनवट येथून इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये तांत्रिक औद्योगिक शिक्षण दिले‌. या शिवाय गोविंदनेही आईवडिलांचं कष्ट वाया जावु नये म्हणून स्वतः च्या मेहनतीवर जिद्दीवर, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेत उत्तम यश संपादन केले. त्याच्या या यशामध्ये मामा राम विठ्ठल प्रेमलवाड यांचे मार्गदर्शन व पाठबळ मोलाचे ठरले आहे.काही मित्रांचेही मोलाचे सहकार्य लाभले.या उल्लेखनीय यशाबद्दल
मा.राज्यसभाखासदार डॉ.अजितजी गोपछडे, मा. सुनील एंबडवार, मा. उमाकांत गोपछडे, कै.बाबाराव एंबडवार प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक – गोविंद डुमनवाड सर , सर्व शिक्षकवृद व जय किसान माध्यमिक विघालयाचे मुख्याध्यापक – विजय होपळेसर , मा.मु.हावगीराव गोपछडे सर , सर्व शिक्षकवृद मा.सरपंच – संजय मुंडकर,उपसरपंच प्रतिनिधी पेंटाजी दासपले, सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील गणपत करेवाड, माजी सरपंच गंगाधर उत्तरवाड, गावातील स्वतंत्र सैनिकाचा नातु मुरलीधर उत्तरवाड, रामराम मानेमोड, माधव मानेमोड सर, गणेश सुवर्णकार सर, मुकुंद उपासे सर, राजेश मुंडकर सर, शंकर गोपतवाड ,नामदेव पारटवाड सर, युसूफ शेख सर, सैन्य दलातील गोविंद आंबेराव दारूबंदी पीएसआय जमनाजी मानेमोड,माजी सैनिक केरबा मानेमोड, एस आर पी दलातील संतोष मदेवाड, काशीनाथ मानेमोड,नागोराव बोथंलवाड, सुभाष मदेवाड,शिवराज गोपतवाड ,बालाजी कोपलवाड गोरेगावकर, प्रकाश मानेमोड,भगवान हसनाळे, चंद्रकांत उत्तरवाड, उत्तम मदेवाड,योगेश्वर हसनाळे,शिवलिंग पिटलेवाड, हानमंत पिटलेवाड,शाम प्रेमलवाड,लक्ष्मण पारटवाड,हाणमंत उत्तरवाड, अंकुश उत्तरवाड, चंद्रकांत मानेमोड, संभाजी उत्तरवाड, अर्जुन मामीलवाड, अंकुश उत्तरवाड, ओमकार मदेवाड,करण पारटवाड, अर्जुन पारटवाड, मारोती पिटलेवाड , इत्यादी व सर्व गावकर्यांनी अभिनंदन करत पुढील देशसेवेच्या वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Leave a Reply