अवैध रेती चोरट्या मार्गाने वहातुक करणारे हायवा टिप्पर ला पकडले ३० लाख ३० हजार रुपयाचे मुद्देमाल जप्त..

भोकर पोलीस विभागाची धाडसी कारवाई…
भोकर ( प्रतिनिधी ) शहरासह तालुक्यात अवैधरीत्या खुलेआम रेती वाहतूक सुरू आहे.फेब्रुवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास भोकर शहरातील शहीदप्रफुल नगरमध्ये जाणारा हायवा क्रमांक एम.एच.२६ सी.एच.१६२९अवैध रीत्या गौण खनिज रेती वाहतुक करताना भोकर पोलिसांनी पकडली.सदरील वाहनातील रेती ज्याची किंमत २० हजार आणि २५ लाखाचा हायवा वाहन असा मुद्देमाल जप्त करून टिप्पर चालक तेजस गोविंद चिट्टे रा.बेंबर आणि टिप्पर मालक विजय संभाजी देशमुख रा.विष्णुपुरी यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे.तर दुसऱ्या कार्यवाहीत टिप्पर क्रमांक एम.एच.०४ जी.एफ ०४९९ मध्ये भोकर-मुदखेड रोडवरील मौजे जांभळी फाट्यावर गौण खनिजाची अवैध रित्या रेती वाहतूक करताना सदरील टिप्परला पकडले यातील रेती ज्याची किंमत १०हजार आणि पाच लाखांचे टिप्पर असा मुद्देमाल जप्त करून चालक रामदास व्यंकटी कसबे आणि टिपरमालक अच्युत विश्वनाथ कुंचलवाड यांच्याविरुद्ध चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची कार्यवाही २ आणि ४ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्रीला गस्तीवर असलेल्या पोलीस पथकांनी कार्यवाही केली सदरील कार्यवाही पोलिस निरीक्षक अजित कुंभार ,पो.उ.नि.सुरेश जाधव, पो.हे.काॅ.सोनाजी कानगुले ,पो हे कॉ सोमदत्त पुल्लोगार, प्रमोद जोंधळे ,लक्ष्मण रत्नपारखे ,शेख मकसूद, माणिक तेलंगे ,नरेश पिंगलवाड ,पंकज हनवते, भिमराव जाधव यांच्या सहभागाने कामगिरी केली आहे.