भगवान महर्षी वाल्मीकी ऋषी यांनी रामायण या पवित्रग्रंथाची निर्मिती करणारे महान आद्यकवी – गुणवंत मिसलवाड..

नांदेड- आपल्या या भारत देशामध्ये, जगामध्ये मानव कल्याणासाठी अनेक संत, महंत, ऋषीमुनी होऊन गेले
त्यापैकीच एक म्हणजे ५५०० वर्षापूर्वी त्रेतायुगात भगवान महर्षी वाल्मीकी ऋषी यांनी रामायण घडण्याअगोदर रामायण या पवित्र ग्रंथाची निर्मिती करणारे महान आद्यकवी म्हणजे भगवान महर्षी वाल्मीकी ऋषी हे होत असे प्रतिपादनएसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. १७ ऑक्टोंबर २०२४रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता रघुकुल रित सदा चली आयी, प्राण जाए पर वचन न जाई. रामायण महाकाव्य रचनाकार, संस्कृतचे आद्यकवी भगवान महर्षी वाल्मीकी ऋषी यांची जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात
आली. या जयंतीनिमित्त अभिवादन सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.सर्वप्रथम आगार व्यवस्थापक मा. श्री. अनिकेत बल्लाळ यांच्या हस्ते भगवान महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले,की, भगवान महर्षी वाल्मीकी ऋषी यांनी २४ हजार श्लोक ७ अध्यायामध्ये रामायण या ग्रंथाची रचना केली असून,पौराणामध्ये चार वेद, सहा शास्त्र, १८ पुराणांपैकी रामायण हा एक ग्रंथ असून याच ग्रंथावर आधारित प्रभू श्रीरामाच्या जीवनातील कालक्रमानुसार बालकांड, आयोध्याकांड, अरण्यकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड अशा सहा
भागांमध्ये विभागले गेले असून आजघडीला आपण सर्वांनीच तुम्ही आम्ही सर्वजण भगवान महर्षी वाल्मीकी ऋषी यांचा आदर्श घेऊन समाजाप्रती देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक मा. श्री. अनिकेत बल्लाळ, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्रीनिवास रेणके, पाळीप्रमुख मनोहर माळगे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वरिष्ठ लिपीक नितीन मांजरमकर, गुलाम रब्बानी सौ. रेखा माचीनवार,सुनीता हुंबे, प्रियंका खरात, वैष्णवी गंदेवार, वाहक दिगंबर जटाळे, चालक जी. पी. कोकरे, कृष्णा पवार, संजय मंगनाळे, शिवचरण मळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रा.प.म. आगारातील कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.