माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते पिरकोन येथील रंगमंचाचे उद्घाटन

अर्धापूर उमरी उरण उस्मानाबाद शिव छत्रपती शिवाजी महाराज किंनवट किंनवट माहुर कोडलवाडी धर्माबाद हदगाव किंनवट हदगाव हिमायतनगर किनवट किनवट धर्माबाद हदगाव हिमायतनगर कोडलवाडी कोडलवाडी धर्माबाद हदगाव हिमायतनगर तामसा तामसा अर्धापूर धर्माबाद नांदेड नांदेड.भोकर.किनवट नांदेड किंनवट माहुर कोडलवाडी धर्माबाद हदगाव हिमायतनगर नांदेड वंचित बारड बिलोली. भोकर भोकर.नादेंड.मुदखेड.बारड.किनवट.उमरी.धर्माबाद माहुर माहुर कोडलवाडी धर्माबाद हदगाव हिमायतनगर मुदखेड रायगड हदगाव हदगाव हिमायतनगर माहुर कोडलवाडी धर्माबाद हदगाव हिमायतनगर हिमायतनगर माहुर
उरण दि 17( विठ्ठल ममताबादे )
स्व मंगळ्या गोपाळ गावंड यांच्या स्मरणार्थ अशोक मंगळ्या गावंड यांनी भव्यदिव्य असे रंगमंच बांधून दिले. गावंड परिवाराचे हे कार्य निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी व आदर्श आहे.विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी खूपच चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांचे मी मनापासून आभार मानतो.रयत शिक्षण संस्थेच्या पिरकोन येथील हायस्कुलचे सर्व शिक्षक, पालक वर्ग, शाळा व्यवस्थापनचे सर्व सदस्य शाळेच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस प्रयत्नशील असतात असे गौरवोदगार माजी आमदार बाळाराम पाटील यांनी काढले.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिरकोन,ता. उरण जि. रायगड येथे स्व. मंगळ्या गोपाळ गावंड यांच्या स्मरणार्थ श्री अशोक मंगळ्या गावंड यांनी रंगमंच बांधून दिले होते त्या रंगमंचचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे विभागीय चेअरमेन बाळाराम पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बाळाराम पाटील यांनी शाळा व्यवस्थापण कमिटी, शिक्षक वर्ग करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले व सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल महानगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष जे. एम.म्हात्रे,पिरकोन ग्रामपंचायतच्या सरपंच कलावती पाटील , माजी सरपंच रमाकांत जोशी, जेएनपीटी विद्यालयाचे प्राचार्य रमाकांत गावंड, पिरकोन हायस्कूलच्या प्राचार्य बल्लाळ मॅडम, पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन अनंत गावंड, पिरकोन स्कूल कमिटीचे चेअरमेन जीवन गावंड,ग्रामपंचायत सदस्य निखिल गावंड,अंकित पाटील, कमलाकर गावंड आदी मान्यवर उपस्थित होते.
