भोकर नगर परिषदेचे नवे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी पदभार स्वीकारला

भोकर (तालुका प्रतिनिधी)येथील नगर परिषदेचे नवे मुख्याधिकारी म्हणून शैलेश फडसे यांनी अतिरिक्त पदभार स्वीकारला असून अर्धापूर नगर परिषदेचाही मूळ कारभार त्यांच्याकडे आहे.
भोकर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ. प्रियंका टोंगे यांची जून 2023 मध्ये बदली झाल्यानंतर भोकर येथे अतिरिक्त पदभारावरच नगर परिषदेचा कारभार चालू होता त्यामुळे अनेक विकासकामे खोळंबली होती 27 जून 2024 रोजी अर्धापूर येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना भोकर नगर परिषदेचा अतिरिक्त पदभार देण्यात आला नायब तहसीलदार मारुती जगताप यांनी काही महिने अतिरिक्त पदभार सांभाळला होता मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी भोकर नगर परिषदेचा पदभार स्वीकारला असून सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन माहिती जाणून घेतली कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला भोकर शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी आदिवासी क्रांती मराठी न्यूज ला माहिती दिली