भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती ची निवडणुक महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वच जागेवर पुर्ण ताखतीने लढवणार – तालुकाध्यक्ष साईप्रसाद जटालवार.

सहकार खात्याने नांदेड जिल्ह्यातील पाच कृषिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर केल्या असून त्यात भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचा देखील समावेश आहे.भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती ची निवडणूक प्रक्रिया 27 मार्च रोजी सुरु होणार आहे. 29 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होऊन त्या नंतर एक ते दोन दिवसात मत मोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्या अनुशंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सेवा सहकारी सोसायटी मतदार संघाच्या 11 जागेवर, ग्रामपंचायत मतदार संघाच्या 4 जागेवर, व्यापारी मतदार संघाच्या 4 जागेवर व हमाल मापाडी मतदार संघाच्या 1 जागेवर निवडणूक लढविणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष साईप्रसाद जटालवार यांनी दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे नेते मा.दिलीप बापु धोत्रे,महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेने चे अध्यक्ष मा. संतोष भाऊ नागरगोजे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष माँटीसिंग दादा जहागीरदार यांच्या मार्गदर्शनात सदर निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना बळीराजांच्या प्रत्येक संकटात बळीराजा सोबत आज पर्यंत उभी आहे.भोकर कृषी उत्त्पन्न बाजार समिती मध्ये आज पर्यंत करण्यात आलेला भ्रष्टाचार उघड करण्या करिता व शेतकरी बांधवांचे हित जोपासण्यासाठी,शेतकरी बांधवांची बाजार समिती कडून होणारी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे सर्व उमेदवार भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती ची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढवणार असल्याचे प्रतिपादन तालुकाध्यक्ष साईप्रसाद जटालवार यांनी केले आहे.तर शहराध्यक्ष आकाश गेंटेवार यांनी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर च्या पूर्ण जागा लढविणार असल्याच्या माहितीस आदिवासी क्रांती मराठी न्यूज प्रतिनिधी शी पुष्ठि दिली आहे.