जागतिक मधुमेह दिन ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा

भोकर :- आज दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय पेरके सर,
अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे सर, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. राजाभाऊ बुट्टे सर, नोडल अधिकारी डॉ.हनुमंत पाटील सर,यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांच्या निरीक्षणाखाली आज ग्रामीण रुग्णालय भोकर ” जागतिक मधुमेह दिन ” साजरा करण्यात आला. या वर्षाचे घोष वाक्य ” आयुष्याच्या प्रत्येक टप्पावरील मधुमेहच्या काळजीसाठी ” हे आहे.
यावेळी बाह्य रुग्ण विभागात उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मधुमेहबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. मधुमेह- आयुष्यभराची जबाबदारी,एकत्रित काळजीची गरज! म्हणूनच प्रत्येक टप्प्यावर योग्य प्रतिबंध, तपासणी व उपचार यांची आवश्यकता आहे. मधुमेह हा आजार बालपण, प्रजननकाळ, कार्यक्षम प्रौढ वय व वृद्धत्व या सर्व टप्प्यांवर परिणाम करू शकतो. मधुमेहचा मुख्य संदेश
मधुमेह होऊ नये व झाल्यास काय दक्षता घ्यावी या बद्दल समुपदेशन करण्यात आले.
बाल्यावस्थेपासून वृद्धात्वापर्यंत प्रतिबंध व उपचार सतत केली पाहिजेत, आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक आधार यामुळे प्रत्येक वयात मधुमेहग्रस्त व्यक्ती अधिक सक्षम होतात, मधुमेह आयुष्याचा प्रत्येक टप्प्यावर परिणाम करू शकतो.
– -: मधुमेह लक्षणे :-
– • वारंवार लघवी होणे,
– • अचानक वजन कमी होणे,
– • वारंवार तहान लागल्यासारख वाटणे,
– • अशक्तपणा किंवा चक्कर येणे,
– • दृष्टी अंधुक होणे,
– • सतत थकवा येणे.

– -: मधुमेह प्रकार :-
– १) मधुमेह टाईप १
– २) मधुमेह टाईप २
– ३) गरोदरपणी मधुमेह

– -: मधुमेह कारणे :-
– १) अनुवांशिक,
– २) लठ्ठपणा, सतत बसून काम करणे,
– ३) तंबाखू, सिगारेट, मद्याचे व्यसन
– ४) चाळीशीनंतर मधुमेहाची शक्यता वाढते.
– – मधुमेहावार नियंत्रण मिळवता येते….
– – संतुलित आहार,
– – वेळेवर औषधोपचार,
– – नियमित व्यायाम.
– मधुमेहावर रामबाण उपाय.
– -: विशिष्ट उपचार :-
– – रक्तदाब नियंत्रित ठेवणे,
– – रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे,
– – वजन नियंत्रित ठेवणे,
– – डोळे व पायांची नियमित तपासणी करणे.
-: नियमित व्यायाम केल्याचे फायदे -:
– – रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते,
– – इन्सुलिनच्या पातळीत सुधारणा होते,
– – मधुमेह नियंत्रित ठेवते,
– – हृदयाशी संबंधित रोगांशी बचाव करते.
विशेष काळजी :- आपल्या रक्तदाबाची व रक्तातील साखरेची तपासणी नियमित करा.
मधुमेह असल्याचे माहिती पडल्यास नियमित औषधी घ्या व नियमित नित्यक्रम पाळा.
चला, एकत्र येऊ या… जागरुकता वाढवू या आणि मधुमेहाविरुद्ध कायमस्वरूपी बदल घडवू या…!
यावेळी
एनसीडी वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर रेड्डी
आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक थोरवट, औषध निर्माण अधिकारी मल्हार मोरे, एनसीडी अधिपरीचारिका श्रीमती भालेराव,एनसीडी समुपदेशक रेणुका भिसे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply