ज्याभारत देशात मुलगी जन्माला यावी म्हणून तपश्चर्या करावी लागायची त्याच देशात मुलींची गर्भातच हत्या केली जात आहे
प.पू.बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराजयांचे प्रतिपादन
भोकर (तालुका प्रतिनिधी) याच भारत देशात नारींची पूजा केली जात असे, नारिंनीं महान कार्य केल्याचा इतिहास आहे ज्या भारत देशात मुलगी जन्माला यावी म्हणून तपश्चर्या केली जात होती त्याच भारत देशात आज मुलींची गर्भातच हत्या केली जात आहे ही फार मोठी शोकांतिका आहे असे महत्त्वपूर्ण विचार प.पू. बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांनी हळदा ता.भोकर येथील शिवमहापुराण कथेत बोलताना मांडले.
भोकर तालुक्यातील हळदा येथे महादेव मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण तुकाराम महाराज बीज महोत्सव कार्यक्रमानिमित्त 26 फेब्रुवारी 2026 पासून शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे,चौथ्या दिवशीच्या कथेमध्ये कथा प्रवक्ते प.पू. बालयोगी गजेंद्र चैतन्यजी स्वामी महाराज बोलताना म्हणाले अज्ञानरूपी अंधकार घालवायचा असेल तर भगवंताचे नामस्मरण करा, भगवान भोलेनाथांची कथा जीवाचा उद्धार करणारी आहे, मूर्तीला केवळ दगडाची मूर्ती समजू नका त्यामध्ये देवाचे अस्तित्व आहे, अंतकाल समयाला देखील भगवंताचे नाम घेतले तर ते कामाला येते, कथा कीर्तनाने दोष निघून जातात, कथा मनोरंजनासाठी नाही तर परिवर्तनासाठी आहे, आपण हरी रूप झाले पाहिजे हा देह भगवंताने दिला आहे त्यासाठी चांगले काम करा ही मालमत्ता आपली नाही हा सुंदर देह भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी आहे, कधी गर्व अभिमान करू नका कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही, भगवंताचे स्मरण करा तो सर्वांवर कृपा करतो, कलियुगात तप महत्त्वाचे आहे समाजाच्या कल्याणासाठी कार्य करावे, राजा हिमालयाने मुलगी जन्माला यावी म्हणून शंभर वर्ष तपश्चर्या केली त्यानंतर पार्वती मातेचा जन्म झाला, त्याकाळी नारींची पूजा केली जात असे आणि आज वाईट परिस्थिती झाली मुलींची गर्भातच हत्या केली जाते स्त्रीभ्रूणहत्या केली जाते, त्याचे परिणाम देखील वाईट झाले समाजात मुलींचे प्रमाण कमी झाले मुलांसाठी मुली मिळत नाहीत, निसर्ग बदलला नाही आपण बदललो आहेत म्हणून वेगळे परिणाम बघायला मिळत आहेत, आज देशात कुणीच सुखी नाही, आई-वडिलांचा आदर करा चांगले गुण अंगी बाळगा ईश्वर भक्ती आणि चिंतन करा नक्कीच जीवन बदलून जाईल भाग्यरेषा सुद्धा बदलेल असेही शेवटी गजेंद्र चैतन्य स्वामी महाराज म्हणाले. महिलांची मोठ्या प्रमाणावर शिवपुराण कथेला गर्दी होत आहे शिवपार्वती विवाह मोठ्या आनंदात पार पडला.
