भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणक शांततेत मतदान पार पडले..

Adiwasi kranti Marathi news
भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज झालेल्या 18 जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेमध्ये महिला आणि पुरुष मतदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग चांगल्या वातावरणामध्ये मतदान केले.त्यामुळे मतदानाची टक्केवारी 96.98 % अशी होऊन विक्रमी मतदानाची नोंद झाली. उद्या शनिवार दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्या पासून भोकर तहसील मध्ये मतमोजणी होणार आहे.
यामध्ये सेवा सहकारी संस्था, 606 मतदारांपैकी 594 मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये पुरुष 485 आणि महिला 109.
ग्रामपंचायत मतदार संघामध्ये 499 मतदारांपैकी 484 मतदारांनी आपला हक्क बजावला.
हमाल मापाडी मतदारसंघांमध्ये 98 मतदारांपैकी 96 मतदारांनी आपला हक्क बजावला.
तर व्यापारी मतदारसंघांमध्ये 255 मतदारांपैकी 240 मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले.
एकूण 1458 पैकी 1414 मतदान झाले आहे. *96.98%*
सर्व मतदान पूर्ण झाले असून शांततेत पार पडले आहे.
मतदानाची एकूण टक्केवारी 96.98 टक्के.
सदरील मतदान प्रक्रिया किनवट रोड वरील जी. प. हायस्कूमध्ये पार पडली, काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांनी मोठा बंदोबस्त लावला होता. Brs ने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्यामुळे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, हे मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत तळ ठोकून होते. हे विशेष.