एसटी डेपो नांदेड आगार येथे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा
Adiwasi kranti Marathi news
नांदेड- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. १ मे २०२३ सोमवार रोजी
सकाळी ठिक ७.०० वाजता महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापन दिन व ३४ वा जागतिक कामगार दिन
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना
देण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, सहाय्यक कार्यशाळा
अधीक्षक संदीप गादेवाड, वाहतूक निरीक्षक मोबीन मैनोद्दीन शेख, कोंडीबा केंद्रे, सुधाकरराव घुमे, एसटी
मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, चार्जमन विष्णुकांत
हारकळ, वरिष्ठ लिपीक नितीन मांजरमकर, संतोष देवकांबळे, वाहतूक नियंत्रक सौ. कल्पना गाडे, राजेश
कांबळे, सुनील मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राष्ट्रगीतानंतर लगेचच महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गुणवंत एच. मिसलवाड यांनी सामूहिकरित्या
घेतले. यानंतर आगार व्यवस्थापक आशिष मेश्राम यांनी आपले मनोगत व्यक्त करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन मांजरमकर यांनी
मांडले. याप्रसंगी आगारातील कामगार, कर्मचारी मंगेश झाडे, सौ. शिल्पा ढवळे, आम्रपाली जमदाडे, सारीका
कदम, कलावती नरवाडे, आनंदा कंधारे, विजय खेडवनकर, संदीप देशमुख, गुलाम रब्बानी, सोमनाथ पोशट,
सुरक्षा रक्षक पांडूरंग बुरकुले, गंगाधर वटाणे, उत्तम घडलिंगे, रमेश भिसे, अशोक कल्याणकर, आर. ए. रणवीर,
प्रभू तिडके, एस.के. जमदाडे इत्यादी कामगार- कर्मचारी बंधु भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.