भोकर येथे मुदखेड रोड येथे आपला दवाखाना चे लोकार्पण

भोकर शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’आपला दवाखाना व नागरी आरोग्य
वर्धिनी केंद्र’अशा दोन दवाखान्याचे लोकार्पण महाराष्ट्र दिनानिमित्त १मे रोजी करण्यात आले.आरोग्य सेवेचे प्राथमिक
बळकटीकरण करण्यासाठी राज्य
सरकारने महाराष्ट्र दिनापासून मोफत आरोग्य सेवेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. कामगार,गोरगरीब नागरिकांना वेळेनुसार मोफत आरोग्य सेवा व औषधोपचार
देण्यासाठी शहरातील जुना दवाखाना येथे.हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यान्वित करण्यात आला आहे.तसेच शहरातील मुदखेड रस्त्यावर नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र सुरु केले आहे. आरोग्य वर्धिनी केंद्रावर
सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत आणि दुपारी २ ते रात्री १० पर्यंत आपला दवाखाना येथे बाह्यरुग्ण सेवा सुरु राहणार आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे, डॉ.लालु बोराडे, डॉ. व्यंकटेश निलेवार यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका गोखले, डॉ.यांच्यासह अनिल बगुलवार परिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी यांची सदरील ठिकाणी नियुक्ती
करण्यात आली आहे.

Google Ad