गोल्डन वाईन्स मधील दारू द्वारे बेलपाडा गावातील ग्रामस्थांना विषबाधा.सोनारी गावातील गोल्डन वाईन्स दुकानातील प्रकार
Adiwasi kranti Marathi news 15/05/2023
सदर अन्यायाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर कडू यांनी फोडली वाचा.जाब विचारण्यास गेलेल्या ग्राहकांना दुकान मालकाडून अरेरावीची व उडवाउडवीची उत्तरे.चूक कबूल करण्या ऐवजी ग्राहकांनाच पोलीस केस करण्याची धमकी.जिएसटी भरावी लागेल म्हणून कोणत्याही ग्राहकांना बिल दिले जात नाही.
बिल न देता दारूची विक्री, शासनाची फसवणूक.
उरण दि 15 (विठ्ठल ममताबादे ) बेलपाडा गावचे रहिवाशी तथा रायगड जिल्ह्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर सुदाम कडू यांनी आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त सोनारी बस स्टँप वर असलेल्या गोल्डन वाईन्स या दुकानातून दारू मागवली. शनिवार दि. 13/5/2023 रोजी संध्याकाळी 5 वाजता दारू आणण्यासाठी बेलपाडा गावातील ग्रामस्थ प्रकाश पाटील व धर्मेंद्र ठाकूर गेले होते. 2 बॉटल (2 लीटरचे)मेकडोनाल्ड व 4 बीअर किंगफिशर असे दारू त्यांनी घरी आणली.दारू घरी आणून पिली असता त्यातील 7 जणांना उलट्या सुरू झाल्या. दारू पिल्या मुळे त्वरित विषबाधा झाली व दारू पिलेल्या व्यक्तींनी अनेकदा उलट्या केल्या. सदर विषबाधा झालेल्या व्यक्तींना जासई मधील डॉ डोंगरे यांच्या दवाखान्यात उपचार करून सोडण्यात आले आहे.सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सदर नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या गोल्डन वाईन्स मधील मालकाला, कर्मचाऱ्यांना मधुकर कडू यांनी जाब विचारला असता मालकाच्या कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तसेच आपली चूक लपविण्यासाठी नविन दारू फ्री मध्ये कर्मचाऱ्यांनी मधुकर कडू यांना देण्याचा प्रयत्न केला परंतु मधुकर कडू यांनी ते नविन दारु घेतली नाही.आपली चूक लपविण्यासाठी नविन दारू फ्री मध्ये दारू दुकानाचे कर्मचारी मधूकर कडू यांना देत होते पण ते त्यांनी नाकारले. दारू पिऊन विषबाधा होऊन एखाद्या नागरिकाच्या जीवाचे बरेवाईट झाले कींवा एखादयाचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न मधूकर कडू यांनी दुकानदाराला विचारला असता गोल्डन वाईन्समधील कर्मचारी निरुत्तर झाले. आपली चूक असूनही सोनारी मधील गोल्डन वाईन्स मधील कर्मचाऱ्यांनी चूक मान्य केली नाही. उलट मधुकर कडू यांना तुमच्यावर पोलिस केस करू असे दारूच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी धमकी दिली. हा प्रकार घडल्या नंतर दिनांक 15/5/2023 रोजी सकाळी 11 च्या सुमारास पोलीस प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन गेले मात्र पोलिस कर्मचाऱ्यांनी गोल्डन वाईन्स मधील कर्मचाऱ्यांवर व दुकानावर कोणतेही कारवाई केली नाही. विषबाधा होऊनही दारूच्या दुकानावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने जनतेनेही पोलिसांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.शॉप नंबर 2,ग्राउंड फ्लोअर,कार्पोरेट पार्क,सोनारी येथे गोल्डन वाईन्स दारूचे कार्यरत असून या वाईन शॉप मध्ये कोणालाच बिल दिले जात नाही.वाईन शॉप वाले जिएसटी (टॅक्स )भरावी लागेल म्हणून सरकारची हि फसवणून करत आहेत. कोणत्याही ग्राहकाला पावती (बिल )दिले जात नाही.त्यामुळे या दुकानावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर कडू यांनी प्रशासनाकडे केली आहे.ही सर्व माहिती मधुकर कडू यांनी पत्रकारांना दिली. घडलेल्या घटने बाबत पत्रकारांनी गोल्डन वाईन्सच्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. गोल्डन वाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही. प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.असे वाईट प्रकार करणाऱ्या वाईन्स शॉप वर कायदेशीर कारवाई त्वरित करण्यात यावी अशी मागणी आता जनतेतून सुद्धा होऊ लागली आहे.