गडगा डाक सेवकासह पोष्ट मास्तर यांच्यावर तात्काळ कार्यवाही करा… सामाजिक कार्यकर्ते बंडेवाड अन्यथा आंदोलन छेडणार.
पोस्टाच्या मनमानी कारभाराला वैतागले लाभार्थी
नोकरी कमी लिडरकी जास्त
केंद्र शासनासह राज्य शासनाचेही संगायो , पि एम किसान योजना असो किंवा घरकुलासह विहीरीचे अनुदान लाभार्थींना पोस्टाच्या माध्यमातून शासन देत आहे .मात्र पोस्टातील कर्मचारी व अधिकारी यांच्या फालतू कारभारामुळे शेतकरी वैतागले आहेत. कुठल्याही कामाचा लोड नसताना लाभार्थींना अरेरावी करत ऐथील खाते बंद करा आणि बँकेत खाते उघडुन घ्या असे गडगा येथील डाक सेवक लोकांना सांगत आहेत. पोष्ट मास्तर यांच्या समोर असे सांगीतल्या जाते पन त्यावर कुठलीही कार्यवाही न करता सतत गैरहजर राहणे वेळेवर कार्यालयात न येणे कार्यालयांना वेळेत कुठेही हॉटेलवर बसने. दुसर्या कर्मचा्यांवर दबाव टाकून आपली स्वतःची कामे करुन घेणे ..महिला तसेच वृद्ध यांच्यासह शेतकरी वैतागला आहेत.. चालु असलेली खाते बंद करावयाची वेळ लाभार्थींना आली आहे..