भोकरच्या मूख्य चौकातील अवैद्य प्रवाशी वाहने हटविण्याची मागणी : श्यामसुंदर पाटील लगळूदकर
Adiwasi kranti Marathi news
भोकर(प्रतिनिधी)शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मूख्य चौकात अवैद्य प्रवाशी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स मॅजीक जिप आदि वाहने रस्त्यातच थांबत असल्याने वयोवृध्द नागरीक महिलांना रस्त्यावरुन चालणे अवघड झाले आहे तात्काळ अवैद्य प्रवाशी वाहने हटविण्यात यावी अन्यथा १ जून पासून अमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा जिल्हा काँग्रेस कमेटी सरचिटणिस शामसूंदर पा.लगळूदकर यांनी दि.३० रोजी तहसीलदार याचेकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते किनवट रस्त्याच्या दोन्ही बाजूने चारचाकी वाहने उभी राहत असल्याने तसेच दूचाकीस्वारांनी आपली वाहने देखिल रस्त्यातच लावत असल्यामूळे या रोडवरील व्यापारी वैतागले आहेत हि समस्या मागील अनेक दिवसापासून भेडसावत आहे परिणामी रस्त्यावरुन पायी चालणार्यांना जिव मूठित धरुन चालावे लागत आहे या वाहनामूळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे रस्त्याची रुंदि मोठी असून देखील फळविक्रेते हातगाडे आॅटोचालक अवैद्य प्रवाशी वाहतूक करणारी ट्रॅव्हल्स मॅजीक आदि वाहने रस्त्यातच उभी करित असल्याने शहरातल्या नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे असे नमूद करुन सदरिल अवैद्य वाहतूक करणारी वाहने व रस्त्यावरील दूचाकी तात्काळ हटवून रस्ता मोकळा करुन द्यावा अन्यथा तहसील कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येईल अशी मागणी शाम पाटील लगळूदकर यांनी तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.