Adiwasi kranti Marathi news

उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )हौसेला मोल नसते असं म्हटलं जाते. त्याचाच अनुभव नवीन पनवेलमध्ये आला आहे. पोळी भाजी केंद्र चालक नारायण कंकणवाडी यांनी चक्क सोन्याचा वर्ख लावून पुरणपोळी बनवली आहे. सोन्याचा वर्ख देऊन बनवलेल्या दोन पोळ्यापैकी एक मंदिरात आणि दूसरी त्यांच्या मित्राला भेट देण्यात आली.

नवीन पनवेल शहरातील नारायण कंकणवाडी यांच्या शिवा पोळी भाजी सेंटर मध्ये सोन्याची पुरणपोळी बनवली जाते. संपूर्ण रायगड जिल्ह्यात त्यांची पुरणपोळी प्रसिद्ध आहे.उज्जैन मध्ये गेल्यानंतर कंकणवाडी यांना सोन्याची कुल्फी दिसली होती. त्यानंतर त्यांना आपण सोन्याची पुरणपोळी बनवावी असे सुचले. त्यांनी रविवारी ही सोन्याचा वर्ख लावून पुरणपोळी बनवली. हा प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला. सोन्याचा वर्ख दिलेल्या दोन पुरणपोळ्या त्यांनी बनवल्या. शिवा पोळी भाजी सेंटरमध्ये दररोज दोनशे हुन अधिक पुरणपोळ्या बनवल्या जातात. यातील दोन पोळ्यांना त्यांनी सोन्याचा वर्ख लावला.त्यातील एक पुरणपोळी पनवेल शहरातील शिवा विश्वनाथ महादेव पावन मंदिरात चरणी अर्पण करण्यात आली तर दुसरी पोळी त्यांचे मित्र डॉ वाय. बी.सोनटक्के यांना दिली. संपूर्ण महाराष्ट्रातील सोन्याचा वर्ख देऊन केलेली ही पहिली पुरण पोळी असेल असे मत नारायण कंकणवाडी यांनी व्यक्त केले.

Google Ad