Adiwasi kranti Marathi news portal

उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )आत्माराम ठाकूर मिशन संचलित जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल, आवरे, ता. उरण, जि. रायगड व श्री अंबिका योग कुटिर ठाणे शाखा नेरुळ यांच्या संयुक्त विदयमाने आवरे येथील भोलानाथ मंदिरात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन श्री अंबिका योग कुटिरचे योग शिक्षक डॉ. शांताराम आरोटे यांनी केले. तसेच परमपुज्य हटयोगी निकम गुरुजी यांनी खेडयापाडयात जावून लोकांना पोवाडे गाऊन आरोग्याचे महत्व पटवून देत गेली ५० वर्ष हटयोगाच्या अनुभवातून योगाचा प्रसार केला असे त्यांनी सांगितले.श्री अंबिका योग कुटिर ही योग संस्था कुठलेही मानधन किंवा पैसे न घेता लोकांना मोफत योगाचे शिक्षण देते.असेही त्यांनी सांगितले.

 

सध्याच्या जीवनशैलीमध्ये विदयार्थ्याचे शारीरीक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगा हे जीवनाचे अविभाज्य घटक असून प्रत्येक विदयार्थ्याने रोज नियमित योगा केला पाहिजे असे मत संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर यांनी व्यक्त केले. यावेळी पवनमुक्तासन, कंधरासन, चक्रासन, बकासन, शिर्षासन, हलासन, सुर्यनमस्कार व प्रारंभिक शुध्दीक्रिया या योग प्रकारात विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.योग शिक्षक संतोनु दुबेसी, डॉ. शांताराम आरोटे, किरण कोतीयान, विनोद भूजनेय व रणजित शिवराजन यांनी वरील आसने प्रत्यक्ष केली.व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी गेल्या वर्षी इ.१० वीच्या विदयार्थ्यांनी त्रैमासिक वर्ग पूर्ण केल्याबद्दल त्यांना योगाची प्रशस्तिपत्रक योग शिक्षकांच्या हस्ते देण्यात आली. सदर कार्यक्रमात २२१ विदयार्थ्यांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेची योगशिक्षिका निकीता म्हात्रे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विदयालयाच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Google Ad