उमरी बायपास चौकात ट्रकच्या धडकेत युवक ठार..
भोकर तालुका (प्रतिनिधी) – भोकर पासून जवळच
असलेल्या उमरी रस्त्यावर सुभेदार रामजी आंबेडकर
चौकात भरवेगात सिंमेट घेवून जाणऱ्या ट्रकने एका
मोटर सायकल स्वाराला जोराची धडक दिल्याने
३३वर्षीय इसमें ठार झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार
दि.२४जून सायंकाळी ५-३० वा. घडली. अधिकवृत असे की चंद्रपूरहून भोकर मार्गे उमरीला सिमेंट घेऊन जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक एम एच२६एच ४१११ हा भर वेगात जात असतांना समोर शिवसेना कार्यकर्ता (ठाकरे गट) गुजराल बालाजी सूर्यवंशी वय ३३ रा. पोमनाळा हा मोटरसायकल क्रमांक एम एच २६ बी झेड ०५८० या गाडीवरून देवकृपा काँटन मिलकडे जात असताना ट्रक चालकाने पाठी मागून जोराची धडक देवून अंगावरून गेल्याने गुजराल सूर्यवंशी हे जागीच ठार झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की गुजराल यांचे
शरीर डोके फुटून आतडे बाहेर आले हातपाय मोडून
चेंदामेंदा झाला ट्रक चालक हा दारू पिऊन होता पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले ट्रक चालकाचे नाव शिवाजी लक्ष्मण राठोड रा. किंवळा वडगाव ता. लोहा येथील आहे. या चौरस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत खरे पाहता नांदेड -रस्त्यावर डोंगरे टी पाईट जवळ उड्डाणपूलाची कांहीच गरज नव्हती पण तीथे पुल होते उमरी -भोकर चौरस त्यावर उड्डान पुलाची खरी गरज होती परंतु लोकप्रतिनिधी व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणी अनेकांचे बळी जात आहेत. गुजराल सूर्यवंशी यास दोन मुले आई वडील भाऊ असा परिवार आहे.अपघाताची दुसरी घटना दि. १९ जून रोजी महामार्ग भोकर-नांदेड रस्त्यावर टेंप्पो व मँजिक गाडीची समोरा समोर धडक होवून ७ जन ठार झाले ही घटना असंताना दुसरा अपघात घडला आहे. या दुर्दैवी अपघाता मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.