ध्येय समोर ठेवून जिद्दीने अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना हमखास यश मिळते- मारोतराव कवळे गुरुजी

भोकर( तालुका प्रतिनिधी)गरीब विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊन अभ्यास देखील करतात ध्येय समोर ठेवून विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास केल्यास यश हमखास मिळू शकते असे विचार व्हीपीके समूहाचे उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांनी नांदेड येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
विश्वकर्मा सेवा संघ जिल्हा नांदेड यांच्या वतीने शंकरराव चव्हाण प्रेक्षा ग्रह येथे विश्वकर्मीय समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व उपवर वधू वर परिचय मेळावा समाजभूषण पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन दि.9 जुलै 2023 रोजी करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिलोली चे माजी नगरसेवक अरुण गंगाधर उपलवार हे होते करण्यात आले होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नागेश्वर पांचाळ छ.संभाजी नगर हे होते प्रारंभी भगवान विश्वकर्मा प्रभू यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले उपस्थित मान्यवरांचा सन्मान झाल्यानंतर समाज भूषण पुरस्कार योग गुरु नागोरावजी पोलादवार,ह.भ.प.मधुकर महाराज शेंबोलीकर,व्यंकटेश चौधरीशिक्षण विस्तार अधिकारी,भोकरचे माजी सरपंच शिवाजीराव पांचाळ यांना सन्मानपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले तर विशेष कार्य गौरव पुरस्कार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमाकांत पांचाळ,मधुकरराव शेलगावकर यांना देण्यात आला महिलांना हिरकणी पुरस्कार श्रीमती राधाबाई किशन सुंकरकरवार भोकर,ज्योतीबाई पांडुरंग पांचाळ कुरुळा, शोभाताई राजेश पांचाळ हाडोळा विशेष कार्य गौरव डॉ.पुष्पांजली उमेश पांचाळ,प्रियंका संतोष पांचाळ यांच्यासह दानशूर व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला प्रस्ताविकात केशव दादजवार यांनी विश्वकर्मा सेवा संघाच्या कार्याची माहिती दिली सर्वांच्या सहकार्यातून अतिशय चांगल्या प्रकारे विश्वकर्मा सेवा संघाचे काम चालू असल्याचे ते म्हणाले डॉ.नागेश पांचाळ यांनी संघटनातून समाजाची उन्नती होते समाजाने समोर आले पाहिजे सेवा संघाचे काम चांगले आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हे महत्त्वाचे कार्य होत असून विद्यार्थ्यांनी आवडीचे क्षेत्र निवडावे बुद्धीचा चांगला वापर करावा ध्येय ठरवून काम करण्यास सुरुवात करा तेव्हाच यश मिळते संघर्ष करावा लागतो आराम करून चालत नाही मोबाईलचा वापर कमी करावा असेही ते म्हणाले, उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यामुळे समाजाचे जीवन जगण्यासाठी प्रेरित होते गरीब विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊ शकतात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गरिबीतून शिक्षण घेऊन घटनेचे शिल्पकार बनले,बिहार राज्यातून स्पर्धा परीक्षेमधून अनेक विद्यार्थी घडतात याबाबत विचार करण्याची गरज आहे,स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अनेक क्षेत्र आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी न समजता जोमाने प्रयत्न करावा असे विचार त्यांनी मांडले, ऋषिकेश रामदास पांचाळ ह्या विद्यार्थ्यास कै.सोपानराव शूर स्मरणार्थ घोषित करण्यात आलेली 11 हजार रुपयाची शिष्यवृत्ती देण्यात आली, गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला वधुवर परिचय मेळावा घेण्यात आला सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर पांचाळ,चंद्रकांत पांचाळ यांनी केले आभार प्रदीप बीजमवार यांनी मानले विश्वकर्मा सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमास परिश्रम घेतले

Google Ad