कु.अनुष्का गंगाधरराव कोकाटे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम

कु.अनुष्का गंगाधरराव कोकाटे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी 2023 मध्ये झालेल्या परीक्षेत माझ्या शाळेतील विद्यार्थीनी (मंजुळाबाई किन्हाळकर मुलींचे विद्यालय भोकर,) कु.अनुष्का गंगाधरराव कोकाटे हिने जिल्ह्यातून शहरी सर्वसाधारण गटामध्ये 29 वा क्रमांक तर भोकर तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे यश संपादन केले आहे.
या यशाकरीता संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ माधवरावजी पाटील किन्हाळकर, सचिव मा. शेख मुराद मांजरमकर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष इंजिनिअर विश्वंभर पवार व सर्व संस्था सदस्य यांनी शाळेच्या गुणवंत,यशस्वी विद्यार्थीनीचे व मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.