भोकर सरकारी रुग्णालयात मेडीशन व डॉक्टर अपुरे रूग्णाची होते गैरसोय.:रूग्ण हक्क संरक्षण समिती मराठवाडा उपाध्यक्ष

भोकर : सरकारी रुग्णालयात होते रूग्णाची गैरसोय दवाखाना घालतोय राम भरोसे भोकर तालुक्यातील व परिसरातील रुग्णालयच ‘आजारी’ असल्याचा आरोप होत आहे.या रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा आहे, पण जेव्हा आवश्यकता असते, तेव्हा ती बंद असते. अंदाजे ५० खाटांच्या या रुग्णालयामध्ये फक्त २५ खाटा उपलब्ध आहेत.येथे डॉक्टरांचीही कमतरता आहे. औषधी केंद्रात औषधांचा तुटवडा आहे,तर कुठे मुदत संपलेली औषधे,गोळ्या गरीब रुग्णांना विकल्या जात आहेत. यामुळे स्थानिकांत संताप आहे.

थोडक्यात माहिती अशी की
या रुग्णालयाच्या स्टोअर रूममध्ये औषधांचा दुष्काळ आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना बाहेरून औषधे,गोळ्या खरेदी कराव्या लागत आहेत.असाच प्रकार भोकर तालुक्यातील खेडे गावात ग्रामीण रुग्णालयातही आहे.भोकर शहरातील रूग्णालयात साफसफाई ला दुर्लक्ष करत असल्याने रूग्ण दुर्गंधी कचऱ्यामुळे वेगवेगळ्या आजाराने त्रस्त आहे.या रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर आणि उपचारासाठी महत्त्वाची उपकरणे उपलब्ध होण्याची रुग्ण आतुरतेने वाट पाहत रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधेची स्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही.स्थापनेनंतर वादे वाढले, दावे वाढले आणि बजेटही वाढले, पण स्थिती आजही तीच आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारीपद असो व अन्य कोणतेही वैद्यकीय पद असो ते त्या योग्यतेनुसार भरलेले नाही.भोकर शहरातील रूग्णालयाचा कारभार झाला राम भरोसे हातात काकडी सारखे. मुख्य वैद्यकीय अधिकारी असुन सुद्धा ते नसल्यासारखे आहेत.काही डॉक्टर तर दवाखाना १० उघडतो तर ते येतात ११:३० ला मग काय करणार रूग्णाची सोय.दि.२०/०७/२०२३रोजी दवाखान्यात एक्सरे रूमची लाईट नव्हती त्या दिवशी रूग्णाची गैरसोय झाली दवाखान्यात जर सारखी लाईट जात असेल तर यांला जिमेदार कोण गैरसोय करणारे दवाखान्यातील कर्मचारी व वेरिष्ठ डॉक्टर आहेत.याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देले पाहीजेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Google Ad