मुख्याध्यापिका सौ. शोभा तेलंग यांचा सेवापूर्ती गौरव

Adiwasi kranti Marathi news
भोकर तालुका प्रतिनिधी येथील जि प प्राथमीक शाळा येथील मुख्याध्यापिका सौ. शोभा संभाजी तेलंग लांडगे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दी. 1आ गस्ट2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी एम.जी.वाघमारे, विस्तार अधिकारी अनिल शिरसाठ, केंद्रप्रमुख बी.जी पडलवार, पत्रकार बी. आर. पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सत्कार मूर्ती सौ शोभा तेलंग यांचा त्यांचे पती लांडगे यांचा आहेर देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्या कार्याबाबत शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी विचार व्यक्त केले अतिशय मेहनत अतिशय कष्ट व जिद्दीने विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी तेलंग यांनी मोलाचे प्रयत्न केल्याचे मान्यवरांनी सांगितले या कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद मान्यवर मंडळी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *