शेतकरी कुटुंबातील कष्टकरी बेरोजगार विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवावी या मागणी करिता ग्राम विकास मंत्रालय यांना निवेदन.सम्राट अशोक सेना
अकोला:अकोला येथे दि.९/ऑगस्ट २०२३ रोजी ग्राम विकास मंत्रालय यांना निवेदन अकोला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले शेतकरी कुटुंबातील कष्टकरी बेरोजगार विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवावी या मागणी करिता ग्राम विकास मंत्रालय यांना निवेदन.सम्राट अशोक सेनेकडून.विषय महाराष्ट्राती ३४ जिल्हा परिषद मध्ये.१९६४० जागेसाठी ५ ऑगस्ट २०२३ रोजी जाहीर केले,जिल्हा परिषद ची जाहिरात देऊन विद्यार्थी.विद्यार्थिनी कडून महाराष्ट्र सरकार बेरोजगार असलेल्या विद्यार्थ्यांकडून एस सी/ एसटी करिता ९००/तर ओपन करिता १०००/ रुपये.IBPS या प्रायव्हेट कंपनी मार्फत परीक्षा शुल्क बेरोजगार विद्यार्थ्यांची लूट करण्याची सुरुवात केली आहे.२०१९ मध्ये आरक्षित वर्ग विद्यार्थ्यांकडून,परीक्षा शुल्क २५० रुपये तरी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांकरिता परीक्षा शुल्क ५०० रुपये होते चार वर्षात तिप्पट रक्कम कशी काय वाढ झाली.?.२०१९ मध्ये परीक्षा जाहीर केली आणि तात्काळ रद्द केली,सरकारच्या तिजोरीत परीक्षा शुल्क,३३ कोठे ३९ लाख ४५ हजार २५० रुपये २०१९ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत जमा आहेत.तो जमा झालेला पैसा कुठे गेला.?. परीक्षा रद्द होते बेरोजगार विद्यार्थ्यांचे कष्टाचे,शुल्क परत का होत नाही.?. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्या विद्यार्थ्यांकडून एक रुपयाही न घेता बिना शुल्क फॉर्म भरण्यात यावे,बेरोजगार विद्यार्थ्यांचे आधीच सरकारकडे उधारी बाकी आहे ते कधी परत करणार.?.परीक्षा रद्द होते,शुल्क परत का नाही.?.त्यामध्ये एकाही आमदार,खासदार,मंत्र्याचा पोरगा या परीक्षा भरतीत नाही या भरतीत फक्त कष्टकरी बेरोजगार शेतकऱ्यांचे मुल आहेत म्हणून यांच्या कष्टाचा पैसा तात्काळ त्यांना वापस करा आणि हे लूट थांबवा.पहिलेच महागाईचा भस्मासुर आमच्या छाताडावर येऊन उभा आहे आणि अशात तुम्ही या विद्यार्थ्यांची लूट करता,मागच्या वर्षी तिरंगे झेंडे वाटून आमची लूट केली यावर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क घेऊन लूट करू नका,इंग्रजांनी सुद्धा या देशाची एवढी मोठी लूट केली नाही तेवढी लूट या देशाची सरकार या राज्याची सरकार कष्टकरी बेरोजगार विद्यार्थ्यांची करत आहे,म्हणून हा तात्काळ प्रकार बंद कर विद्यार्थ्यांकडून आधी घेतली शुल्क यावरच परीक्षा घ्या अशीच आम्ही मागणी करतो अन्यथा या राज्यात हे बेरोजगार विद्यार्थी उद्रेक घातल्याशिवाय राहतील नाही हाच आम्ही इशारा देतो,,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,,आकाश दादा शिरसाट,,बेरोजगार विद्यार्थ्यांची लूट बंद करा,ग्राम विकास मंत्री होश मे आओ.मुख्यमंत्री होश में आओ..