तीन हजार रुपयांसाठी गुंड सावकाराने मातंग बांधवाच्या डोळ्यात मिरची टाकून रॉडने मारत घडवले हत्याकांड,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले

Adiwasi kranti Marathi news portal
अकोला:अकोला येथे आज दि.१२/६/२०२३/रोजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले,महाराष्ट्राला हादरून टाकणारे घटना लातूर जिल्ह्यात घडली मन सुन्न झालंय..तीन हजार रुपयांसाठी गुंड सावकाराने मातंग बांधवाच्या डोळ्यात मिरची टाकून रॉडने मारत घडवले हत्याकांड, महाराष्ट्रात दिवसान दिवस दलितांवर अत्याचार होत आहे या सर्व घटनेचा सम्राट अशोक सेनेकडून जाहीर निषेध,,
लातूर रेणापूर:अतिशय संतापजनक घटना आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे.गिरीरत्न तबकाले या मातंग गरीब बांधवाने गावातील सावकाराकडून तीन हजार रुपये 10% टक्याने व्याजाने घेतले.तीन हजारांच्या बदल्यात 20 हजार रुपये वसूल केले तरीही आणखी पैसे बाकीच आहे म्हणत भर बाजारात काठीने मारहाण केली.
तबकाले रेणापूर पोलीस स्टेशनला गेला नेहमी प्रमाणे दलित असलेल्या पीडिताची तक्रार घेतली नाही उलट बाँडवर जखमी पीडिताचा जबाब घेऊन प्रकरण दडपून टाकले.
हाताला गंभीर मार लागल्यामुळे तो हॉस्पिटलला गेला,पोलिसांनी कार्यवाही केली नाही त्यामुळे आरोपीचे बळ वाढले.
दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिरत्न तबकाले याच्या घरी त्याने सकाळी 6 वाजताच हल्ला चडवला.हल्ला अतिशय क्रूरपणे केला, आरोपी अन् त्याचा भाचा या दोघांनी मिरची पावडर डोळ्यात टाकून रॉडने हल्ला केला या हल्ल्यात मातंग बांधव मृत्यूमुखी पडला.
दलित आहे आमचं काय करणार या मानसिकतेतून त्याची आर्थिक लुटमार केली आणि मस्ताडलेल्या हरामीने जणू पोलीस यंत्रणा खिश्यात घातली या मानसिकतेतून ही हत्या केली.
राज्यात दलित सुरक्षीत नाहीत, नांदेडची घटना ताजी असताना ही अतिशय क्रूर घटना समोर आली जाहीर निषेध करत असून राज्य सरकारला प्रश्न विचारत आहे की मातंग समाजाचे हे हत्याकांड तुम्ही गंभीर घेणार आहेत की नाही?
निर्दयी खून करणाऱ्या आरोपींना आम्ही सोडणार नाहीत.राज्यव्यापी आंदोलन छेडणार कुणी मातंग बांधवांना एकटं समजू नये त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन नका. आणि घडलेल्या घटनेमध्ये तात्काळ न्याय मिळाला हे केस फास्टट्रॅक कोर्ट मध्ये चालून आरोप यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे हीच आमची सम्राट अशोक सिनेकडून मागणी, सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य, आकाश दादा शिरसाट,जय भीम जय लहुजी