मौजे चिंचोळा येथील स्वस्त धान्य दुकानदाराची स्थानिक स्थळ चौकशी करण्याची मागणी

Adiwasi kranti Marathi news portal
भोकर(भोकर तालुका प्रतिनिधी) येथील मौजे चिंचाळा येथील सामाजिक कार्यकर्ते अन्नावर इरण्णा दिगंबर मौ.चिंचाळा तालुका भोकर जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून मौजे चिंचाळा येथील स्वस्त धान्य दुकानदार हा गोरगरीब व्यक्तीला गरीब शेतकऱ्यांना विधवा स्त्रीयांना शेती नाही व रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याला वेळेवर राशन धान्य देत नाही, वरील दुकानदार यांची स्थळ चौकशी करून वरील सर्व लाभार्थी यांना प्रत्येक महिन्याला राशन धान्य मिळावे, व गावातील श्रीमंत बलाढ्य शेतकऱ्यांना फोन करून तुमचा माल* घेऊन जा असे बोलावून प्रत्येक महिन्याला राशेन देत आहे तरी पुरवठा अधिकारी यांनी वरील चिंचाळा येथील स्वस्त धान्य दुकानदाराची त्वरित स्थळ चौकशी करून योग्य ते कार्यवाही करून जे खरे लाभार्थी आहेत त्यांना राशन मिळवून देण्यात यावे अशा आशयाच्या मागणीचे निवेदन अन्नावर ईरन्ना दिगंबर यांनी भोकर तहसीलचे तहसीलदार राजेश लांडगे यांना देण्यात आले आहे.